दर्पण दिनानिमित्त ‘भवताल, माध्यमे आणि आपण’ विषयावर
एमजीएम मध्ये परिसंवाद
नांदेड (जिमाका) दि. 5 :- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारीता व माध्यमशास्त्र महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता एमजीएम महाविद्यालय नांदेड येथे ‘भवताल, माध्यमे आणि आपण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी
डॉ.विपीन इटनकर, जि.प.च्या
मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकुर, जिल्हा पोलीस
अधिक्षक प्रमोद शेवाळे, नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद
रापतवार यांची उपस्थिती असणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी, संपादक शंतनु डोईफोडे, संपादक मुन्तजोबोद्दीन
मुनिरोद्दीन, पत्रकार पन्नालाल शर्मा, सौ.राजश्री
मिरजकर, भारत होकर्णे, कुवरचंद मंडले
हे परिसंवादात मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे,
असे आवाहन महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारीता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment