प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चा
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागांची महत्वकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 (pmkvy 3.0) या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 8 लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी 948.90 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे.
नांदेड येथील प्रधानमंत्री
कौशल्य केंद्र
(pmkk) एमपावर प्रगती, किड्स किंगडम शाळेच्या जवळ नांदूसा रोड खुरगाव येथे सीसीटीव्ही स्थापना
तंत्रज्ञ, फील्ड टेक्निशियन आणि इतर होम अप्लायन्सेस, मेकअप कलाकार (CCTV Installation Technician. Field
Technician And Other Home Appliances. Makeup Artists) या तीन अभ्यासक्रमासाठी विनामुल्य कौशल्य प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येणार
असून नांदेड जिल्ह्यासाठी 522 प्रशिक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात
आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
कार्यालयाचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवाड यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment