रस्ता सुरक्षा अभियान 2021 अभियानांतर्गत
रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे मंगळवारी
प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजन
नांदेड, (जिमाका) दि. 30:- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवार 2 फेब्रुवारीला सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
रस्ते अपघातात मृत्युचे प्रमाण कमी व्हावे या
उद्देशाने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत बत्तीसावा रस्ता सुरक्षा
अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये रस्ते वाहतुक नियमाविषयी जनजागृती
करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव
करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment