Sunday, November 15, 2020

जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या बसेसवर कारवाई

प्रवाशांना तक्रार नोंदविण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, बस क्रमांक, प्रवाशाचा तपशिल, तिकीट क्रमांक आदि माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा ईमेल rto.26-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी केले आहे. 

दिवाळी सणानिमित्त खाजगी प्रवासी बसमधून मोठया प्रमाणावर प्रवाशांची वाहतूक केली जाते. याचा फायदा घेण्यासाठी काही ट्रॅव्हल्स कंपन्याकडून जादा भाडे आकारुन प्रवाशांची लूटमारही केली जाते. असे प्रकार घडून नये म्हणून यावर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी मागील आठवडयात मोठया प्रमाणावर खाजगी बसेसची तपासणी केली. यात मुंबई, पुणे, नागपूर व हैद्राबाद येथून येणाऱ्या व जाणाऱ्या सुमारे शंभर बसेसची तपासणी केली. तसेच शनिवार व रविवारी (दिनांक 14 15 नोंव्हेबर) खाजगी बस ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाची तपासणी केली. यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या भाडेदराची माहिती दिली व ट्रॅव्हल्स कंपन्यानी प्रवाशांकडून आकारलेल्या पावत्याची तपासणी केली. तसेच कोवीड-19 रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून शासनाने दिनांक 6 नोव्हेंबर 2020 व राज्याचे परिवहन आयुक्त मुंबई यांनी दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. 

नांदेड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलेल्या कारवाईमुळे यावर्षी जादा भाडे आकारणाऱ्या (ट्रॅव्हल्स) बसेसची एकही तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाली नाही. कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रवाशांनी मास्क, हॅन्ड सॅनिटायजर व सुरक्षित अंतर आदि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी केले.

0000



No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...