Thursday, November 12, 2020

 

शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे बी.एड 2020 परीक्षेत घवघवीत यश   

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या बी.एड 2020 उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच लागला झाला आहे. येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविलेले असून शासकीय अध्यापक महाविद्यालयाने याही वर्षी यशाची परंपरा कायम राखत 93 टक्के प्रशिक्षणार्थी पास झाले आहेत.

या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बी.एड 2019-2020 चा निकाल लागला असून  100 टक्के प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्तीर्ण होण्याचे श्रेय प्राचार्या व सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले आहे. तसेच प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांनी सर्व प्राध्यापकांचे व प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. सर्व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे, डॉ. सय्यद शाकेर, डॉ. उमेश मुरुमकर,  डॉ. विठ्ठल घोनशेटवाड, श्री. गच्चे व विद्यापीठ विभाग श्री. सोनाळे, श्रीमती अनिता होळकर व सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...