Friday, November 6, 2020

 

मिपा रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती

निमित्त वेबिनार संपन्न 

औरंगाबाद, दिनांक 6(विमाका) :- मिपा संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि नेतृत्व यावर चर्चा घडवून आणण्याचा महत्वाचा उपक्रम घडवून आणला या बद्दल अभिनंदन करत त्रिभाषासूत्र अवलंबिणे, मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देणे, आदिवासी क्षेत्रात तेथील बोली भोषेतून शिक्षण देण्यासाठी नवीन उपक्रम निर्माण करणे तसेच आनंददायी शिक्षणाचा संपूर्ण राज्यभर विस्तार करणे या करीता एकविसाव्या शतकाचा सामना करण्यासाठी कौशल्य विकास करणे गरजेचे असल्याचे सुतोवाच राज्याच्या शालेय शिक्षण क्रिडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी केले.

            महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन प्रशासन मिपा,औरंगाबाद या संख्येने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि नेतृत्व या आधारित वेबिनार सिरीजचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे दिनकर पाटील, मिपाच्या संचालक डॉ. नेहा बी. बेलसरे यांची उपस्थिती होती.

            एकविसाव्या शतकाचा सामना करण्यासाठी कौशल्य विकासामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन त्यांचा संपुर्ण राज्यभर कसा विस्तार होईल यावर चर्चा घडावी असे सांगून श्रीमती कृष्णा म्हणाल्या की, शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणे, गरजाभिमूख प्रशिक्षण कसे त्याचे मूल्यमापन कसे करावे, शिक्षकांची पदोन्नती, पी.टी.आर. धोरण, शाळा समूह धोरण, आदी विविध धोरणावर वेबिनार सिरीजमध्ये चर्चा घडवून यावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी  व्यक्त केली.

            राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे, दिनकर पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मिपा ही राज्याची शैक्षणिक नेतृत्व करणारी संख्या असून शिक्षण क्षेत्रात सर्व अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी मिपावर आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी चांगल्या रितीने होण्यासाठी प्रमुखांची भूमिका महत्वाची असते, जसे की , शालेय गुणवत्ता ही तेथील प्रमुख मुख्याध्यापक यावर निर्भर असते. जसा मुख्याध्यापक तशी शाळाया तत्वाने नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या प्रमुखांची भूमिका महत्वाची आहे. मिपा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त शुभेच्छा देऊन दिनकर पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणाची सांगता केली. 

            शिक्षण विभागाचे  आयुक्त विशाल सोळंकी आपल्या अध्यक्षीत भाषणात म्हणाले की, कोविड-19 च्या काळात वेबिनार सिरीजच्या आयोजनाने मिपा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या वेबिनार सिरीजमध्ये नवीन शैक्षणिक धोरण यावर चर्चा करण्यात येत आहे. शिक्षणांची गुणवत्ता विकसित करणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग यांना प्रशिक्षण देणे, याकरीता मिपाचे नुतनीकरणाचे कामही पूर्णत्वास आले आहे. तसेच संस्थेमार्फत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चांगले मोडयूल्स् तयार करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शैक्षिणक नियोजन प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या मार्फत पाच दिवसीय वेबिनार मालिका संचालक, डॉ.नेहा बी. बेलसरे यांच्या मार्गदर्शना नुसार नुकतीच संपन्न झाली. या वेबिनार सिरीजच्या यशस्वीतेसाठी वैशाली कांबळे, उपसंचालक अरुणा भूमकर डॉ. ज्योती कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

-------------***----------------

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...