Monday, November 30, 2020

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक- 2020

या चार मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल  

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 ची मतदान प्रक्रिया मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यत पार पडणार आहे. नांदेड जिल्‍हयात या निवडणूकीसाठी मतदान केंद्राच्‍या अंतिम यादीनूसार 114 + 9 सहायकारी असे एकूण 123 मतदान केंद्र अंतिम करण्‍यात आले आहेत. यातील चार मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

 

यात केंद्र क्र. 358 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथील केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालय रुम नंबर 1 नांदेड येथे करण्यात आले आहे.

 

केंद्र क्र. 358 अ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथील केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालय रुम नंबर 2 नांदेड (सहायकारी मतदान केंद्र) येथे करण्यात आले आहे.

 

केंद्र क्र. 362 नरसिंह विद्यामंदिर जयभिमनगर नांदेड येथील मतदान केंद्र शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्‍था रूम नं. 1 नांदेड येथे करण्यात आले आहे.

 

केंद्र क्र. 365 जिल्हा परिषद शाळा चौफाळा येथील मतदान केंद्र मदीना उल तलुम उच्‍च माध्‍यमिक शाळा रूम नं. 1 देगलुर नाका, नांदेड येथे करण्यात आले आहे. या ठिकाण बदलाची नोंद घेऊन पात्र पदवीधर मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...