Wednesday, November 4, 2020

 

संचालक मंडळांच्या जबाबदारीवर

वर्षे 2020-21 साठी लाभांश वाटपास परवानगी 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- राज्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर टाकल्या गेल्या. आजवर हा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने विविध सहकारी संस्थांच्या निवडणूका न झाल्यामुळे दरवर्षी सप्टेंबर पर्यंत नित्यनियमाप्रमाणे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्या नाहीत. शिवाय आर्थिक ताळेबंदही सभासदांपुढे मांडल्या गेल्या नाहीत. सहकार कायद्यानुसार लाभांशासाठी सभेत मान्यताही घ्यावी लागते. तथापि यावर्षी निवडणूका न झाल्याने सहकारी संस्थांच्या लाभांश वाटपास परवानगी द्यावी अशा स्वरुपाच्या मागण्या सहकारी संस्थांकडून सहकार विभागाच्या कार्यालयास केल्या जात होत्या. या परिस्थितीचा विचार करुन संचालक मंडळाच्या जबाबदारीवर आर्थिक वर्षे 2020-21 मध्ये लाभांश वाटप करण्यास परवानगी देण्याबाबतचा अध्यादेश मा. राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. सहकारी संस्थांना लाभांश वाटप, लेखा परिक्षकांची नेमणूक करण्याबाबतचे अधिकार संचालक मंडळाला दिले असून वाटपानंतर सर्वसाधारण सभेत मात्र मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.    

00000

No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...