हॉटेल, फुट कोर्टस,
रेस्टॉरन्टस्, बारमधील
कामागारांच्या
कोरोना तपासणीसाठी फिरते पथक
- जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर
नांदेड
(जिमाका) दि. 7 :- हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बारमधील कामगारांची फिरत्या पथकामार्फत
तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. एखादा कामगार कोरोना बाधित असेल तर त्याच्यापासून ग्राहकांना कोरोना विषाणुची लागण होऊ नये यासाठी
खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्देश सर्व संबंधित विभागप्रमुखांना त्यांनी दिले.
पर्यटन
विभागाने केलेल्या मार्गदर्शक प्रणालीचे तंतोतंत
पालन करुन 50 टक्के
क्षमतेने हॉटेल्स, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस्
आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतू त्याठिकाणी प्रवेश देतांना ग्राहकाचे
तापमान व थर्मल स्क्रिनिंग करुनच लक्षणे नसलेल्या ग्राहकांना प्रवेश द्यावा हे
बंधनकारक करण्यात आले आहे. कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाकारुन अशा
बाधितांची तपशिलासह स्वतंत्र नोंदणी करुन
असे तपशील आरोग्य विभाग व प्रशासनास उपलब्ध करुन देण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या
आहेत.
00000
No comments:
Post a Comment