Saturday, August 29, 2020

 

सुदृढ आरोग्यासाठी दररोज एक तास खेळ आवश्यक

-         जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 29 :- चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही शरिराला मिळणाऱ्या व्यायामात दडलेली असते.  हे लक्षात घेता चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास स्वत:च्या आरोग्यासाठी देऊन जमतील तसे खेळ खेळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. कोविड-19 च्या या वातावरणात प्रत्येकाला आपल्या घराच्या परिसरात असलेल्या जागेवरही आरोग्याच्यादृष्टिने व्यायाम करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादुगर) यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणन देशभरात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल ,नांदेड येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलु पारे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी जनार्धन गुपीले, नांदेड सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखील लातुरकर, डॉ. पालिवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आदि मान्यवर उपस्थित होते.   

नवी दिल्ली युवा व खेल मंत्रालयांनी फिट इंडिया फ्रीडम रन हा उपक्रम देशभरात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने नांदेड जिल्हयात फिट इंडिया फ्रीडम रन हा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड जिल्हा सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करुन फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते फिट इंडिया फ्रीडम रन फलेक्सचे रिबीन कापन शुभारंभ करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या बरोबर शासकीय अधिकारी, कर्मचारी व सायकलपटू यांनी सहभाग घेतला. 

या रॅलीचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथून जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल-आयटीएम कॉलेज-आयटीआय-श्रीनगर-वर्कशॉपकॉर्नर-भाग्यनगररोड-आनंदनगर-वसंतराव नाईक चौक (नागार्जुना)-अण्णाभाऊ साठे चौक-व्हीआयपी रोड-आयटीएम मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक अंतराचे पालन करुन यशस्वी करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले तर आभार गुरुदिपसिंघ संधु यानी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, रमेश चवरे, सायकलींग संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर सोनसळे व त्यांचे सहकारी आणि संजय चव्हाण आदिंनी सहकार्य केले.

00000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...