वृत्त क्र. 615
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी साधला
शेतकऱ्यांशी संवाद
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावात कृषी योजनांचा जागर सुरू आहे. यामध्ये तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन फळबाग लागवड कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. याअंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी रविवार 5 जुलै रोजी कंधार तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उस्माननगर येथील बालाजी मारोती गाडे यांच्या शेतातील आंबा फळबाग लागवडीची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 शेडनेटचे उद्घाटन करण्यात आले. या शेडनेटमध्ये यावर्षीपासून भाजीपाला बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यावेळी संतोष गव्हारे, विष्णु इंगोले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सोबत तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, कृषी पर्यवेक्षक बालाजी डफडे, कृषी सहाय्यक सोपान उबाळे यांची उपस्थिती होती.
हळदा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत लागवड केलेल्या यशवंतराव शिंदे, राजू पटलेवाड यांच्या मोसंबी या फळपिकाची पाहणी करण्यात आली. मौजे भूकमारी येथे सामूहिक शेततळ्यातील पाण्याचे जलपूजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे यांच्या हस्ते करण्यात आले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत राहुल कोळंबीकर, मिलींद कोळंबीकर यांनी लागवड केलेल्या पेरू आंबा डाळिंब सीताफळ या फळपिकांची पाहणी व लागवड करण्यात आली. ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे यांची पाहणी त्यांनी केली.
00000
No comments:
Post a Comment