दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसह
शिक्षक व पालकांचा केला गौरव
नांदेड (जिमाका) दि. 29 :- दहावी बोर्ड
परीक्षेचा निकाल आज लागला असून यंदाही नांदेड जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.99 टक्के असून मुलांचे प्रमाण 86.48 टक्के एवढे
आहे. मार्च-2019 च्या परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या निकालात देखील नांदेड
जिल्ह्याची टक्केवारी वाढली असून मार्च-2019 मध्ये 68.13 टक्के निकाल लागला होता.
त्यातुलनेत यंदाचा निकाल 89.53 टक्के लागला. म्हणजे यंदाच्या निकालात 21.40 टक्क्यांची
वाढ ही विद्यार्थ्यांच्या परिश्रमासमवेतच शिक्षक आणि पालकांनी घेतलेल्या कष्टाचेच
द्योतक आहे या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गौरव केला. या परीक्षेत ज्यांना यश
मिळाले नाही त्या विद्यार्थी मित्रांनी नैराश्य झटकून पुन्हा विश्वासाने
अभ्यासाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
000000
No comments:
Post a Comment