साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
शिष्यवृत्तीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 29
:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी गुणवंत
विद्यार्थ्यांनी 9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करावीत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग,
मातंग, मिनीमादीग, मांदीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग
गारुडी, मांग गारोडी, मादीगा व मादगी या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी 2019-20 या
शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या
इयत्ता दहावी, बारावी, पदवी पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी
अभ्यासक्रमात विद्यार्थी, विद्यार्थींना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त
गुण प्राप्त झाले असतील अशा गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज
मागविण्यात आली आहेत.
जेष्ठता व गुणक्रमांकानुसार 3 ते 5
विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रक, दोन
फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत आपले पुर्ण
पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर
नांदेड येथे मुदतीत 9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करता येतील, असेही आवाहन जिल्हा
व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment