Monday, July 20, 2020

वृत्त क्र. 665


गंभीर रुग्णांनाच प्राधान्याने उपलब्ध करावी
खाजगी रुग्णालयातील आयसीयू सुविधा
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
            नांदेड (जिमाका) दि. 20 :- खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेला आयसीयु (अतिदक्षता विभाग) हा खुप गंभीर आजारी असलेल्या रुग्णांनाच प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 
ज्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे, अशा रुग्णांना गरज नसतांना जर अतिदक्षता विभागात दाखल करुन ठेवले तर गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना वेळेवर अतिदक्षता विभागातील सुविधा मिळणे अशक्य होईल. हे टाळण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी योग्य नियोजन करावे, असेही डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले आहे. 
'असिम्टॉमॅटीक' कोरोना बाधीत अर्थात कोणतेही लक्षणे न दिसून येणारे कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या देखरेखीखाली असेलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सर्व योग्य उपचार शासन करीत आहे. 
जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांत उपलब्ध असलेले अतिदक्षता विभाग ही जिल्ह्यातील आरोग्यविषयक सोई-सुविधांच्यादृष्टिने मोठी उपलब्धी असून ती सुविधा ज्यांना खरीच आवश्यकता आहे अशा गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना उपलब्ध व्हावी असेही त्यांनी सांगितले. कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक  उपाययोजनाअंतर्गत जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश निर्गमीत केले आहेत.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...