Tuesday, July 28, 2020


शासकीय दुध योजना परिसरात
हिरव्या गवताचा 30 जुलैला लिलाव
नांदेड, दि. 28 :- शासकीय दुध योजना नांदेड या योजनेच्या परिसरातील हिरव्या गवताचा सन 2019-2020 चा विक्रीचा जाहीर लिलाव गुरुवार 30 जुलै 2020 रोजी शासकीय दुध योजना नांदेड परिसरात येथे दुपारी 2 वा. होणार आहे, अशी माहिती दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना नांदेड यांनी दिली आहे.
लिलावातील अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. लिलावाची बोली बोलण्यापूर्वी कार्यालयात पाचशे रुपये भरावे लागतील. गवताची कापणी व त्यास लागणाऱ्या मजुराची व्यवस्था लिलावधारकाला करणे बंधनकारक राहील. गवताच्या कापणीची मुदत लिलावाच्या तारखेपासून 31 मार्च 2021 पर्यत राहील. गवत कापणीची वेळ सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत राहील. या योजनेच्या आवारात जनावरे चारण्यास मनाई आहे. शासकीय मालमत्तेची, फुलझाडाची व इतर झाडाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. काही नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास भरपाई करुन घेण्यात येईल व ठेका रद्द करण्यात येईल. योजनेतील कर्मचाऱ्यांशी आपण व आपले मजदुर सौजन्याने वागतील याची दक्षता घ्यावी. गवत कापणीबाबतचा करारनामा या कार्यालयात करुन घ्यावा लागेल, तसेच संपूर्ण रक्कमेचा भरणा केल्यानंतर गवत कापण्याची परवानगी देण्यात येईल. परिसरातून गवताचा भारा थेट बाहेर घेऊन जातेवेळी योजनेचे समय लेखक, पाहरेकरी, सहा. सुरक्षा अधिकारी किंवा दुग्धशाळा व्यवस्थापक यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी, कर्मचारी तपासणी करतील. योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापकांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. लिलावाच्या अटी व शर्तीनुसार 25 टक्के रक्कम लिलाव झाल्याबरोबर भरणा करावी लागेल तर उर्वरीत रक्कम 75 टक्के ही  10 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत भरावी लागेल. त्यानंतर गवत कापणीची परवानगी देण्यात येईल. रक्कम ठरवून दिलेल्या तारखांना कार्यालयात भरणे बंधनकारक राहील. रक्कम वेळेवर भरणा नाही केली तर ठेका रद्द करण्यात येईल. भरणा केलेली रक्कम 25 टक्के जप्त करुन शासनाकडे जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी. लिलावात सहभागासाठी तीन पेक्षा जास्त ठेके येणे बंधनकारक आहे. तीनपेक्षा कमी आल्यास किंवा पर्यायी कारणामुळे लिलाव पुढील तारखेस घेण्याचे सर्व अधिकारी दुग्धशाळा व्यवस्थापक यांना राहील, अधिक माहितीसाठी दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना नांदेड येथे 02462-226721 वर संपर्क साधावा, असेही आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...