नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यातील कार्यालय, शैक्षणिक संस्था
(विद्यापीठे,महाविद्यालये / शाळा) या ठिकाणच्या
कर्मचाऱ्यांना प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रासाठी कोव्हिड 19 रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपायायोजनेच्या अधिन राहून
अध्यापना व्यतिरिक्त इतर कामांकरिता कार्यालयात उपस्थित राहून उत्तरपत्रिकांचे
मुल्यांकन आणि परिक्षांचे निकाल यासारखे व इतर कार्यालयीन कामे करण्यासाठी मुभा
देण्यात आली आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या
कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188
नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई
करण्यात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर
यांनी निर्गमीत केले आहेत.
00000
No comments:
Post a Comment