सुधारीत वृत्त क्र. 577
सलून, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर
सुरु ठेवण्यास अटींच्या अधीन राहून परवानगी
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्हयातील केशकर्तनालय
दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर अटी व शर्तीचे अधीन राहून शनिवार 27 जून पासून सकाळी 9 ते सायं. 5
पर्यंत चालू ठेवण्यास पुढील आदेशापर्यंत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी
परवानगी दिली आहे.
राज्य शासनाच्या 25 जून 2020च्या आदेशानुसार केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी व
शर्तीचे अधीन ही परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने केवळ निवडक सेवा जसे की केस
कापने, केसाला रंग देणे इत्यादीला परवानगी असेल परंतू इतर सेवांना सध्या परवानगी नाही. या सेवेच्या बाबी दुकानात स्पष्टपणे
दर्शविल्या जाव्यात. सलून कर्मचाऱ्यांनी हातमोजे,
अॅप्रॉन आणि मास्क इत्यादीचा समावेश असलेले संरक्षक साधने वापरणे
आवश्यक आहे. प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ / निर्जतूक करुन दुकानातील
संपूर्ण क्षेत्र आणि जमिन, पृष्ठभाग, फरशी
प्रत्येक 2 तासांनी स्वच्छ व निर्जंतूक करण्यात यावेत.
टॉवेल्स, नॅपकिन्स यांचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट
लावता येईल अशा प्रकारच्या (Disposable) टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करण्यात यावा. तसेच वापरुन झाल्यावर विल्हेवाट न लावता येण्याजोग्या (Non Disposable) उपकराणांचे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि
निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक आहे. सेवा देणारा व सेवा घेणारा
सोडून इतर व्यक्तीमध्ये 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक
राहील. मास्क, रूमाल नाका तोंडाला झाकुण ठेवील अशा प्रकारचे
असणे आवश्यक आहे. तसेच दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश,
साबण, व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे
बंधनकारक राहील. ग्राहकांना केवळ अपॉइमेंट (Appointment) घेऊनच येण्यास
कळवावे. ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही याची सलुन्स मालकांनी
दक्षता घ्यावी. प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांनी वरिल प्रमाणे घ्यावयाच्या
दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावण्यात यावी. या
अटींचे उल्लघन केल्यास दंडात्मक व कायदेशिर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द
करण्यात येईल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग
प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड
संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात
येईल व कारवाई करण्यात येईल.
सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने
व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच
वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही
अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा
खटला दाखल करता येणार नाही,
असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 26 जून 2020 रोजी निर्गमित केले आहेत.
00000
No comments:
Post a Comment