21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस
साजरा करण्यासाठी सर्वांनी घ्यावा पुढाकार
नांदेड (जिमाका) दि. 19 :- संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग
दिन म्हणून घोषित केला आहे. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्येची
भारताने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. सदृढ आरोग्यासाठी सहज साधा व कोणताही
खर्च न लागणारा योगा सारखा उपाय नाही. मानवाच्या शाररिक व आत्मिक विकासासाठी योग
विद्या अत्यंत सहाय्यभूत असून याच्या प्रचार व प्रसारासाठी सर्व संस्थांनी पुढाकार
घेऊन रविवार 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 या कालावधीत योग दिवस साजरा करावा, असे
आवाहन आयुष संचालनालय महाराष्ट्र शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
योग दिवसानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करतांना कोरोना
विषाणु संदर्भात शासनाने दिलेल्या सूचना व निर्देशाचे तंतोतंत पालन करावे, असेही
स्पष्ट करण्यात आले आहे. यात खालील कार्यक्रमाचे नियोजन करता येईल.
योगा
तज्ज्ञ / एनजीओ यांचे मार्गदर्शनाखाली ऑनलाईन योगा व्याख्यान कार्यशाळेचे आयोजन
करावे. महाविद्यालयातील स्वस्थवृत्त विभागामार्फत, महाविद्यालय व रुग्णालयातील
विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे 15 दिवसांचे प्रति दिवशी 1 तास प्रशिक्षण
कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. योगा या विषयावर महाविद्यालय व रुग्णालयातील
विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग नोंदवून प्रश्न मंजुषा, रांगोळी,
चित्रकला, भित्तीपत्रके आदी स्पर्धेचे आयोजन करावे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे बॅनर
महाविद्यालयाचे दर्शनी स्थळावर लावण्यात यावे.
कोरोना
विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने सामाजिक अंतर तसेच मास्क लावण्याच्या व
आवश्यक काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. याबाबत शासनाने दिलेले निर्देश,
सुचनांचे पालन करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावयाचा आहे. यासाठी संस्था /
सुचनांचे पालन करुन आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करावयाचा आहे. याकरीता आपले
संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच संस्थेचे आजूबाजूचे परिसरातील
जनतेला व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल सारख्या मोबाईल, संगणकीय ॲप या सारख्या अन्य
ऑनलाईन पद्धतीद्वारे संपर्क साधून 21 जून 2020 रोजी सकाळी 7 वा. कॉमन योगा प्रोटोकॉलचे
मार्गदर्शक तत्वानुसार योगाचे ऑनलाईन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
यावे. जेणेकरुन सदर घरातून सुद्धा सहभागी होतील.
त्याचप्रमाणे
केंद्र शासनाने आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्ताने माय लाईफ,
माय योगा या व्हिडिओ ब्लॉगिंग काँन्टॅस्टचे आयोजन केले आहे. त्यानुसार सदर ऑनलाईन
स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक
आहे. संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच संस्थेच्या आजूबाजूच्या
परिसरातील जनतेला या ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता प्रोत्साहन देण्यात
यावे. https://yoga.ayush.gov.in/yoga/idy-2020 व https://www.mylifemyyoga2020/home या संकेतस्थळावर नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. जेणेकरुन सर्व
सहभागी घरुनच या कार्यक्रमामध्ये सहभागी होती. तसेच सदरहून कार्यक्रमाचे आयोजन
करताना कोरोना या विषाणुचे प्रतिबंधानाकरिता शासनाने दिलेल्या सुचना / निर्देशांचे
पालन करावे व त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मुंबई आयुष
संचालनालयाचे संचालक वैद्य कुलदीप राज कोहली यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment