गुणांची
सरासरी विचारात घेऊन
दहावीचा
निकाल होणार जाहीर
नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्यात कोराना आजाराच्या प्रार्दुभावामुळे दहावीच्या सामाजिक
शास्त्रे पेपर- 2 भूगोल विषयाची परीक्षा तसेच दिव्यांग विद्यार्थ्याच्या
कार्यशिक्षण या विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या दोन विषयांसाठी अन्य
विषयांच्या लेखी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात
घेवून गुणदान करण्यात येणार असल्याची माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले
यांनी एका प्रकटनाद्वारे दिली आहे.
दिव्यांग
विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान हे त्यांने अन्य विषयांच्या
लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक अंतर्गत मुल्यमापन / तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या
गुणांची सरासरी विचारात घेवून त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण
विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल, असेही डॉ.
भोसले यांनी स्पष्ट केले. सदर कार्यपद्धती अवलंबून दहावीचा निकाला जाहिर केला
जाणार आहे.
00000
No comments:
Post a Comment