Wednesday, May 27, 2020

शासकीय अध्यापक महाविद्यालयात
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या
 बी.एड.अभ्यासक्रमाचे ऑनलाईन अभ्यास सत्र सुरु
नांदेड (जिमाका) दि. 27 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील अभ्यास केंद्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेशित प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे द्वितीय संपर्क सत्र ऑनलाईन पद्धतीने नुकतेच सुरु करण्यात आले असून या सत्राचे उद्घाटन ऑनलाईन झूम मिटींग ॲपद्वारे 26 मे रोजी पार पडले.
यावेळी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. व्ही. जी. घोनशेटवाड यांनी 22 दिवसाच्या संपर्क सत्रातील अभ्यास कार्याचा परिचय करुन दिला. या कार्यक्रमात समंत्रक प्रा. डॉ. शेख हारुण, प्रा. डॉ. संजिवनी राठोड, प्रा. डॉ. मंजुषा भटकर, प्रवेशित सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक सहभागी झाले होते. दुपारी 12 वा. पासून नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाईन अध्यापन-अध्ययनाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. संपर्क सत्राच्या पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रतिक्रिया समाधानकारक आल्या असून नवीन पद्धतीने वर्ग हो असल्याने प्रशिक्षणार्थ्यांमध्ये वेगळी आवड व जिज्ञासा दिसून आली.  या संपर्क सत्राचा समारोप 14 जून 2020 रोजी होणार असून पुन्हा या प्रशिक्षणार्थ्यांच्या व समंत्रकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येतील, असे प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी समारोपात नमूद केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...