कोरोनाचे नवीन चार रुग्ण
64 स्वॅबची तपासणी चालू
नांदेड, दि. 20 :- कोरोना विषाणु संदर्भात बुधवार 20 मे 2020
रोजी सायं. 7 वा. नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहिती
नुसार बुधवार 20 मे रोजी प्राप्त एकुण 13 अहवालापैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त
झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहचली असून
उर्वरीत 31 नवीन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले तर 33 स्वॅब प्रलंबित असून एकुण 64
स्वॅबची तपासणी चालू आहे.
नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय
अनुक्रमे 24, 32, 33, 54 आहे. स्नेहनगर पोलीस कॉलनी, सांगवी नांदेड, तालुका मुखेड,
भोकर येथील प्रत्येक एक याप्रमाणे 4 रुग्ण असून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय
आयुर्वेद महाविद्यालय येथे, एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय मुखेड व एक रुग्ण ग्रामीण
रुग्णालय भोकर येथे औषधोपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे.
त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे. एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला
तर 36 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनाचे 67 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ.
शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व
यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील
धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण, तर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड
येथे 2 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे एक रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे
1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
सर्व
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व
जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे
करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत
करते, असे आवाहन
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment