Thursday, April 9, 2020


 धर्माबादला 4 लाख 59 हजार रुपयांचा पानमसाल जप्त
            नांदेड दि. 9 :- धर्माबाद सुभाषरोड येथील रविकुमार कोंडावर, राजकुमार कोंडावर या व्यक्तींच्या ताब्यातील विविध 12 ब्रॉन्डचा किंमत 4 लाख 59 हजार 190 रुपयांचा पानमसाला व सुंगधीत तंबाखु जप्त करुन दोन्ही व्यक्ती विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत व बादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबाद पोलिसांनी गुप्त माहितीवरुन धर्माबाद बाळापूर रोड येथील मे. राजराजेश्वर किराणा दुकान येथे धाड टाकून प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास दिली होती. त्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री जिंतुरकर यांनी 8 एप्रिल रोजी धर्माबाद पोलिसांनी ताब्यात दिलेल्या या दोन्ही व्यक्तींवर ही कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी श्री. जिंतुरकर व नमुना सहाय्यक अमरसिंग राठोड यांनी सहायक आयुक्त (अन्न) श्री. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...