Thursday, April 30, 2020


कोरोना बाधित दोन रुग्णांवर उपचार सुरु
14 दिवसानंतर त्यांचे परत स्वॅब तपासणीसाठी घेणार
नांदेड, दि. 30 :- कोरोना विषाणु संदर्भात आज गुरुवार 30 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नांदेड येथे 1 हजार 112 संशयितांची नोंद झाली आहे. वरील दोन्ही कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. त्यांचे 14 दिवसानंतर परत स्वँब तपासणीसाठी घेण्यात येतील.
त्याची  वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.  एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 असून त्यापैकी 795 निगेटिव्ह आहेत तर 180 स्वँब अहवाल प्रलंबित  आहेत. तापर्यंत एकूण 5 स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच 1 निष्कर्ष निघालेला नाही. एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 व त्यापैकी 3 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आहेत.
यापैकी नांदेड शहरात पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा (वय 64 वर्ष) पॉझीटिव्ह अहवाल हा  22 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे 30 एप्रिल पर्यंत प्रकृती गंभीर होती. रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू आज 30 एप्रिल 2020 रोजी झाला असून या रुग्णाचा दफनविधी हा आसरानगर कबरस्तान येथे 5 माणसाच्या उपस्थितीत ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले असून  सर्व 80 व्यक्तींचे अहवाल  पहिले निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आज 29 एप्रिल 2020 रोजी 51 निकटवर्तीय व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वँब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
नांदेड अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा  दि. 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून सदर रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा  दि. 30 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची गंभीर आहे.
वरील दोन्ही कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. त्यांचे 14 दिवसानंतर परत स्वँब तपासणीसाठी घेण्यात येतील. त्यामुळे अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000


विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील मीडिया स्टुडिओमुळे
प्रसारमाध्यमात कुशल पत्रकार  घडतील
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 30 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात  तयार होत असलेला मीडिया स्टुडिओ अत्याधुनीक व आगळा वेगळा व्हावा ,यांमध्ये तांत्रिक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी उद्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा विभाग ठरावा अशी अपेक्षा पालकमंत्री  अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 
काल पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना  तपासणी प्रयोगशाळेस भेट देण्यापूर्वी माध्यम संकुलास भेट दिली. या विभागातील मीडिया  स्टुडिओ उभारणीचे  सुरू असलेल्या  कामाची पहाणी केली.  यावेळी त्यांच्या समवेत आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव  हंबर्डे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे,  नगरसेवक बालाजी जाधव विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
मीडिया स्टुडिओ ची उभारणी, त्यातील उपकरणे, यात अद्ययावत एडिटिंग यंत्रणा, चित्रीकरण कॅमेरा, रेकार्डिग रूम आणि सध्या असलेल्या सुविधा याची माहिती घेतली. या सर्व सुविधांचा लाभ आणि उपयोग विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमात  करिअर  करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे राहील, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी  दिली. हा स्टुडिओ आगळा-वेगळा व्हावा आणि विद्यापीठाची नवी ओळख होण्यामध्ये स्टुडिओची  भूमिका महत्वपूर्ण ठरेल, यासाठी काही सूचना  कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांना केल्या आहेत.
00000000


Wednesday, April 29, 2020


महावितरणचे कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा
--- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 29:- महावितरणचे अर्धवट व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा. शासन आपल्या दारी योजनेतंर्गत प्रलंबित असलेल्या कृषी वीज जोडण्या सुरु कराव्यात, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बैठकीत सुचना दिल्या.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहातील कॅबिनेट हॉल येथे महावितरणच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार तुषार राठोड , जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहने आदींची उपस्थिती होती.
कृषी सौर योजनेतंर्गत मंजूर लाभार्थ्यांची कामे तातडीने पूर्ण करावेत. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांशी सौदार्हपूर्ण वागणूक ठेवून येणाऱ्या अडीअडचणींचे तातडीने सोडवणूक करावी. नवी वीज जोडणीसाठी प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करुन वीज जोडण्या पुरविण्याबाबतही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये नवीन ट्रान्सफार्मरची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्ती करुन देण्यामध्ये मोठा विलंब होतो. त्यासाठी महावितरणने कॉलसेंटर किंवा मोबाईल यॅप विकसित करुन तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्याच्या सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.
वीज बिलाच्या थकबाकीमुळे नवीन पायाभुत सुविधा विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वसुलीमध्ये वाढ करुन महावितरणच्या पायाभूत सोयी सुविधा ज्यामध्ये सबस्टेशन, ट्रान्सफार्मर यामध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच वीज चोरी थांबविण्यासाठी ग्रामीण भागात एव्ही केबल व शहरी भागात भुमिगत केबल टाकण्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत. शहरी भागात प्रिपेड मीटर पध्दती सुरु करण्याचा प्रयत्न करावा. पायाभूत सुविधासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.
महावितरण कंपनी करत असलेल्या कामाचे सादरीकरण अधीक्षक अभियंता संतोष वाहने यांनी केले. जिल्ह्यातील आमदार महोदयांनी त्या-त्या आमदार महोदयांनी त्यांच्या मतदार संघातील अडीअडचणी मांडल्या.
0000


लॉकडाऊनच्या काळात
दिव्यागांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचे वाटप
भोकर नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम
नांदेड दि. 29 :- शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी  विविध प्रकारच्या  मदतीला धावून जात आहे. भोकर नगरपरिषदेच्या मार्फत अनुदान देण्याबाबत आदेश  शासन स्तरावर दिले आहेत. याचाच भाग म्हणून शहराच्या हद्दीतील 174  दिव्यांगांना नगरपरिषद भोकरच्यावतीने वर्ष 2020-21 या चालु वर्षातील दिव्यांग व्यक्तींना निधीचे वाटप केले.
174 पैकी 104 लाभार्थीना बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आले. उर्वरितरित ज्या लाभार्थीकडे बँक खाते नाही अश्या 70 लाभार्थी ना घरपोच धनादेश प्रत्येकी 2 हजार रूपये  प्रमाणे असे एकुण तीन लाख 48 हजार रुपये दिव्यांग व्यक्तींना देण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या घरी जावुन सोशल डिस्टन्सींगचा वापर करित अनुदान वाटप केले.
यासाठी नगरअध्यक्षा सौ. संगीता विनोद चिचांळकर, उपनगरअध्यक्षा जरीना बेगम शेख युसुफ, विनोद पाटील चिचांळकर, मुख्याधिकारी प्रीयंका ठोंगे, सामाजीक कार्यकर्ते शेख युसुफ  यांच्यासह सुनील कल्याणकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रकाश तोटलू कार्यालय अधीक्षक, अविनाश पेंडकर प्रशासकीय अधिकारी, रामसिंह लोध लेखापाल, कमलाकर भगत समुदाय संघटक, साहेबराव मोरे, सचिन वैष्णव, दत्ता गौड अनंतवार, इमरान पटेल, जावेद ईमानदार, शेख शब्बीर, शेख मुखत्तार यांनी नगरपरिषद हद्दीतील सर्व दिव्यांग लोकांची यादी करून सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याने ही मदत केली.

ताळेबंदी असताना सोशल डिस्टन्सींगचा वापर करीत नगरपरिषदेने दिव्यांगाना अनुदान वाटप केले आहे. त्यांच्या रहात्या घरी जावुन चेक वाटप करण्याचा नगरपरिषदेच्या या उपक्रमाने शहरातील दिव्यागांना कोरोनाच्या संकटात अंशतः का होईना जगण्याचा आधार मिळाला आहे. सदरील दिव्यांगाना  अनुदान वाटप करण्यासाठी भोकर नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
00000




तपासणीसाठी शंभर जणांचे नमुने घेतले
कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्याची माहिती
नांदेड दि. 29 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचे एकुण दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती. त्यापैकी काहीही निष्कर्ष न निघालेला एक आहे. आज 29 एप्रिल रोजी तपासणीसाठी घेतलेले नमुने शंभर एवढी आहेत.
आतापर्यंत क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या एकुण 1 हजार 20 एवढी आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 291 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 67 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 121 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 899 अशी संख्या आहे. एकुण नमुने तपासणी 899 करण्यात आली. त्यापैकी 791 नमुने निगेटीव्ह आली आहेत. तर नमुने तपासणी अहवाल बाकी 99 जणांचा आहे. नाकारण्यात आलेले नमुने 5 आहेत. काही निष्कर्ष न निघालेला एक आहे.
नांदेड जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 83 हजार 100 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
00000


रास्तभाव धान्य दुकानात
तीन महिन्यांची साखर उपलब्ध
नांदेड, दि.29 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने एप्रिल, मे  जून 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 260 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन (क्विंटलमध्ये) पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड-187, अर्धापूर- 39, मुदखेड-42, कंधार-94, लोहा-138, भोकर-93, उमरी-72, देगलूर-137, बिलोली-130, नायगाव-121, धर्माबाद-79, मुखेड-199, किनवट-460, माहूर-208, हदगाव-164, हिमायतनगर-97 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000 


सॅनिटायझरचा साठा जप्त, दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल
अत्यावश्यक वस्तुंची साठेबाजी करुन काळाबाजार करु नका
अन्न व औषध प्रशासनाचे जिल्ह्यातील विक्रेत्यांना आवाहन
नांदेड, दि. 29 :- जिल्हयातील किराणा विक्रेते व औषध विक्रेत्यांनी अत्यावश्यक वस्तुंची साठेबाजी करून त्यांचा काळाबाजार करु नका, असे आढळल्यास संबंधिताविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
नांदेड शहरातील मे. फार्मा टेडर्स या दुकानात सिपला कंपनीने उत्पादीत केलेला व जास्त किंमत नमुद असलेला हॅन्ड सॅनिटायझरचा साठा आढळुन आला. दुकानदार केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीस सॅनिटायझरची विक्री करत असल्याचे आढळुन आले. संबंधित दुकानदाराविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत नांदेड वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये नुकताच गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहआयुक्त औरंगाबाद श्री. काळे व सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे
राज्यासह देशात कोविड 19 चा संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. नांदेड जिल्हयात कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अन्न व औषध प्रशासनास फेसमास्क व सॅनिटायझर, अत्यावश्यक वस्तू यांच्या खरेदी, विक्री व साठवणुक यावर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना वेळोवेळी बैठकीत दिल्या आहेत.
त्यानुसार अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यावतीने जिल्हयातील किराणा व औषध विक्री दुकाने यांच्या नियमित तपासण्या करण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून नियमित तपासण्या करण्यात येत आहे. जिल्हयातील किराणा विक्रेते व औषध विक्रेते संघटना यांच्या शहर, तालुकास्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार, साठेबाजी न करण्याच्या, अत्यावश्यक वस्तुचा पुरवठा मुबलक प्रमाणात व सुरळीत सुरु राहिल याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 प्रशासनाने किराणा विक्रेते व औषध विक्रेते यांना दैनंदिन कामकाजावेळी दुकानासमोर कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांची गर्दी होऊ न देण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहे. ग्राहकांना हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवण्यास सांगितले आहे. दुकानात काम करणारे कामगार यांना हातमोजे, मास्क व सॅनिटायझर पुरविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
प्रशासनास सिपला कंपनीने उत्पादीत केलेले हॅन्ड सॅनिटायझर बाजारात उपलब्ध असून त्याची  छापील किंमत केंद्र शासनाने 21 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असुन त्याची विक्री काही विक्रेते जास्त किंमतीत करत आहेत, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे चौकशी केली असता, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील मे. फार्मा टेडर्स या दुकानात सिपला कंपनीने उत्पादीत जास्त किंमत नमुद असलेला हॅन्ड सॅनिटायझरचा साठा आढळुन आला. या चौकशी वेळी दुकानदार सॅनिटायझरची विक्री केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीस विक्री करत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे 27 एप्रिल 2020 रोजी औषध निरीक्षक श्री. निमसे यांनी 3 हजार 100 रुपये किंमतीचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे. संबंधित दुकानदाराविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी दिली आहे.
00000


एनबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ
-          पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच कृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
त्यांनी आज दि.२९ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळे भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर,.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो, पण विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळविली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो.संजय मोरे, डॉ.सुप्रिया मेकर, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती.
दि.२५ आणि २६ एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.
नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते. त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. ना.अशोकराव चव्हाण, विद्यापीठाचेकुलगुरू डॉ.उद्धव भोसले, डॉ.गजानन झोरे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अगदी तीन आठवड्यात या प्रयोगशाळेची उभारणी झाली.द्या दररोज सरासरी १००च्यावर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे. एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्याची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.             
या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच.डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि स्वच्छेने काम करीत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ.सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालुकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.                        
000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...