Wednesday, April 29, 2020


एनबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ
-          पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच कृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
त्यांनी आज दि.२९ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळे भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर,.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो, पण विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळविली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो.संजय मोरे, डॉ.सुप्रिया मेकर, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती.
दि.२५ आणि २६ एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.
नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते. त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. ना.अशोकराव चव्हाण, विद्यापीठाचेकुलगुरू डॉ.उद्धव भोसले, डॉ.गजानन झोरे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अगदी तीन आठवड्यात या प्रयोगशाळेची उभारणी झाली.द्या दररोज सरासरी १००च्यावर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे. एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्याची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.             
या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच.डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि स्वच्छेने काम करीत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ.सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालुकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.                        
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...