जनगणना प्रशिक्षणाची सुरवात
नांदेड दि. 4 :- भारताची जनगणना 2021 साठी जिल्हा, शहर, सर्व चार्ज अधिकारी आणि
रेग्युलर असिस्टंट (संबंधीत जनगणना कर्मचारी) यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन 4 व 5
मार्च 2020 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरत नांदेड येथे सकाळी 9.30 वा.
करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली
भारताची जनगणना-2021 चे अनुषंगाने प्रशिक्षणास आज सुरवात करण्यात आली.
यावेळी मुंबई जनगणना
कार्यालयाचे संचालक यांच्याकडून उपसंचालक रघु अनुमोल, वरिष्ठ निरीक्षक प्रविण भगत,
वरिष्ठ पर्यवेक्षक आर. एस. पाथवे, विलास
होनराव (पाटील) जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर
संकल्पना, कार्यपद्धती, मोबाईल ॲपचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.
हे प्रशिक्षण जिल्हा,
शहर, नगरपालिका, नगरपंचायत सर्व चार्ज अधिकारी तसेच सर्व संबंधीत जनगणना लिपीक
उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड
यांनी दिली आहे.
000000
No comments:
Post a Comment