व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या
संस्थांनी
प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 4 :- महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व
पुर्नवसन योजनेंतर्गत नोंदणीकृत संस्थांना सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी
व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव
शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी
जिल्हा परिषद नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी
जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
सामाजिक न्याय
विभागामार्फत महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पुर्नवसन योजनेंतर्गत
नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी त्यांचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य
लक्षात घेऊन बारा संस्थांना (प्रत्येक महसूल विभागातून दोन संस्था प्रत्येकी)
रुपये 11 लक्ष प्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी प्राप्त
प्रस्तावामधून गुणवत्तेच्या निकषाप्रमाणे शासन स्तरावरील निवड समितीकडून संस्थांची
/ केंद्राची निवड करण्यात येते.
पुणे समाज कल्याण
आयुक्त यांचे निर्देशानुसार सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात
बहुमुल्य काम करणाऱ्या संस्थांकडून अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
शासन निर्णय 10 मार्च 2017 नुसार योजनेच्या नियमावलीस मान्यता दिली आहे. ही
नियमावली, विहित नमुन्यातील अर्ज आदी बाबीची माहिती https://sjsa.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर तसेच संबंधीत जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण
अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
व्यसनमुक्ती
क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी
सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या
कार्यालयात अर्ज सादर करावीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार
करण्यात येणार नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा
समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment