सर्व ऑटो/टॅक्सी चालक-मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक
नांदेड दि. 14 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व ऑटो / टॅक्सी चालक -मालकांना/बॅजधारकांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजना अशा दोन जनतेच्या हितार्थ योजना जाहीर केल्या आहेत. व्यावसायिक वाहन चालक यांनी या योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यानुसार सर्व ऑटो / टॅक्सी चालक - मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेतल्याशिवाय त्यांचे वाहनासंबंधी परवाना / योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. या योजनेकरिता अर्ज सार्वजनिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्यामार्फत करण्यात यावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment