Sunday, January 26, 2020


पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते
शिवभोजन थाळी योजनेचे उद्घाटन संपन्न
        
नांदेड, दि. 26:- गरीब आणि गरजूंना केवळ 10 रुपयात जेवणाची थाळी देणाऱ्या शिवभोजन योजनेची 26 जानेवारी पासून राज्यभर अंमलबजावणी होणार आहे. नांदेड शहरासाठी पाचशे थाळी मंजूर असून, शहरात चार ठिकाणी शिवभोजन थाळीची सुरुवात होणार आहे. भारतीय स्टेट बँक समोर, नवीन मोंढा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अरुण जऱ्हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदिंची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन ही गरीब व गरजू जनतेसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे नांदेड येथे प्रत्येकी 125 थाळीचे चार ठिकाणी निवडले आहेत. यात बस स्थानक,रेल्वे स्टेशन, नवीन मोंढा आणि शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय,विष्णुपुरी या ठिकाणाचा समावेश आहे. प्रायोगिक तत्वावर शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या या शिवभोजन योजनेअंतर्गत भोजनालायत प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या 10 रुपयात देण्यात येणार आहे. शिवभोजन दुपारी 12 ते 2 या कालावधीत उपलब्ध होणार आहे, असेही यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.
0000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...