सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन
शुभारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा
यावेळी आमदार मोहनराव
हंबर्डे, रा.प.म विभाग नियंत्रक अविनाश कचरे, ईसीएचएसचे अधिकारी मेजर बी थापा व
जिल्हयातील कार्यलय प्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी स्वत: प्रत्येक वर्षी 11 हजार रुपये
देवून इतर सर्व सहकाऱ्यांकडून निधी गोळा करुन देण्याचे सांगून हा निधी
एक करोड पर्यंम जमा होईल असे आश्वस्त केले. यामध्ये सर्वांना सामाजिक
संस्था, राजकीय पदाधिकारी, व्यापारी वर्ग व इतर दानशुर व्यक्ती आदींनी सहभागी
व्हावे असे आवाहन केले. हा कार्यक्रम मोठया स्तरावर आयोजीत करण्याच्या सुचना
त्यांनी केल्या. आमदार श्री. हंबर्डे म्हणाले की, स्वत: माजी सैनिक परिवारातील आहे माझे बंधू जवळचे
नातेवाईक हे आर्मी मध्ये आहेत. मला सर्व सैनिकांची, माजी सैनिकांची आत्मीयता आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ.
सचिल खल्लाळ यांनी ध्वजनिधी हा दोनशे
प्रतिशत जमा होईल असे सांगुन सैनिकांच्या/ माजी सैनिकांच्या कोणत्याही अडीअडचणी
असतील तर त्यांनी सरळ भेटावे आम्ही त्यास प्राधन्य देवून असे नमुद केले. सन 2018-19 साठी शासनाने जिल्हयाला 35 लाख 50 हजार 512 रुपये एवढे
उद्दिष्ट दिले होते ते जिल्हयाने 51 लाख 17 हजार रुपये जमा करुन 145 टक्के उद्दीष्ट पुर्ण केले आहे.
यावर्षी देखील शासनाकडुन 35 लाख 50 हजार रुपये एवढे उद्दिष्ट दिले आहे. डिसेंबर 2019 मध्ये दुप्प्टीने निधी जमा
करुन उद्दीष्ट पुर्ण करण्यात येईल, असे यावेळी डॉ. खल्लाळ यांनी सांगितले.
सशस्त्र सेना
ध्वजदिन निधी
संकलनाबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांना पत्रक पाठवून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी
डिसेंबर 2019 मध्येच निधी जमा करण्याचे
आवाहन केले आहे.
या संकलनात जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा तथा महाविद्यालयांनी मोलाचे सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील
ग्रामपंचायत व गांवकरी मंडळी पुढे ऐऊन निधी जमा केला आहे. ग्रामपंचायत कार्यालय
शेळगांव गौरी यांनी 1 लाख एक हजार रुपये निधी जमा केल्याने संजय पाटील
शेळगांवकर यांचा विशेष सत्कार आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हयातील उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालयांना प्रशस्तीपत्र व सैनिकाबाबत महत्व असणारे
विषयाचे व इतर कार्यालयीन उपयुक्त पुस्तके
भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हयातील
वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार करण्यात आला. आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप व महाराष्ट्र राज्य तर्फे माजी सैनिकास क्रिडा
क्षेत्रातील विशेष गौरव पुरस्कार प्रकाश लोंखडे यांचा पाल्य कुमार आशिष यास रोख
रक्क्म 10 हजार रुपये प्रमाणपत्र व सत्कार करण्यात आला. पत्रकार योगेश लाठकर व सुधाकर
शंकरराव दिवान यांनी प्रत्येकी 5 हजार रुपये दरवर्षी प्रमाणे प्रदान केला.
निधी संकलनाची सुरुवात
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी
डॉ. खल्लाळ व प्रमुख पाहुणे यांना ध्वज लावून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात
शहिदांना श्रद्वांजली वाहून
करण्यात आली. यानंतर सैनिक
कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक
करून ध्वजदिन निधीचे
महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा
विनियोग व माजी
सैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना
कशा राबविण्यात येतात याची
माहिती दिली.
या कार्यक्रमास
जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, जवळपास 250 माजी सैनिक / विधवा / अवलंबित उपस्थित
होते. प्रामुख्याने माजी सैनिक संघटना
प्रमुख व्यंकट देशमुख, रामराव थडके, माजी सैनिक कर्मचारी संघटना विभाग प्रमुख पठाण
हयुन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी सैनिक अजय कानोले यांनी केले तर माजी सैनिक पठाण हयुन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यालयाचे सुभे मजीदवार, सुभे काशिनाथ ससाने,किशन
गुरगुटवार, सुर्यकांत कदम, टिपरसे, सुनिल
नवघरे व गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.
000000
No comments:
Post a Comment