Friday, December 20, 2019


जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष
पदांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत रद्द
नांदेड, दि. 20 :- नांदेड जिल्हा परिषदच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर करुन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची पिठासीन अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती व संपुर्ण निवडणुकीची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहे.
ग्रामविकास विभाग मुंबई यांच्याकडील पत्रात नमुद सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 22 दि.23 ऑगस्ट 2019 अन्वये जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची मुदत 20 डिसेंबर 2019 रोजी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 42 45 खाली जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्याक्ष पदाची निवडणुक 20 डिसेंबर 2019 रोजी पासुन उर्वरित पुढील कालावधीसाठी घेणे होते. या अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सुधारित शासनपत्रात या आदेशान्वये 120 दिवसाचा कालावधी हा 20 डिसेंबर 2019 रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर प्रचलीत कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती सुचना नोटीस निर्गमीत करुन सदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्याचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीच्यानिवडणुकीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास सुचना नमुद आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर 2019 रोजीची जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक तांत्रिक कारणास्तव रद्द करणे इष्ट आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...