Wednesday, December 18, 2019


अल्पसंख्यांक हक्क दिवस
जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न
नांदेड दि. 18 :- महाराष्‍ट्र राज्‍य अल्‍पसंख्‍यांक आयोगाचे उपसचिव यांच्या परिपत्रकातील सुचनानूसार जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने आज 18 डिसेंबर 2019 हा दिवस अल्पसंख्यांक हक्‍क दिवस म्‍हणून बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत करण्‍यात करण्‍यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व सहअध्‍यक्ष निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली साजरा करण्‍यात आला. यावेळी उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) संतोषी देवकुळे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुरेश थोरात, प्रमुख वक्‍ते अॅड. शेख जियाओद्दीन शेख अजिमोद्दीन, अॅड सरदार जसपालसिंघ सुखमणी, अनीस शेख जिल्‍हास्‍तरीय अल्‍पसंख्‍यांक कल्‍याण समिती सदस्य जनअधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्‍था नांदेड, जोगिंदरसिंघ खैरा अशासकीय सदस्य महाराष्‍ट्र राज्य पंजाबी साहित्‍य अकादमी नांदेड, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व इतर अल्‍पसंख्‍यांक समुदायातील व्‍यक्‍ती उपस्थित होते.
या कार्यक्रमात अल्‍पसंख्‍यांक समुदायांना निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. खल्लाळ व प्रमुख वक्‍त्‍यांनी पंधरा कलमी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवटी जिल्‍हा नियोजन अधिकारी यांनी अल्‍पसंख्‍यांक समुदायांच्या विचारलेल्‍या प्रश्‍नांबाबत शासनाच्‍या निकषानुसार समर्पक उत्‍तरे देवून शेवटी सर्वांचे आभार मानले.  
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 230 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत अवसायकांची नामतालिका (पॅनल) साठी मागविण्यात आले अर्ज   नांदेड दि. 25 फेब्रुवारी ...