Sunday, October 27, 2019


शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव खरेदी,
शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा  
नांदेड, दि. 28 :- शेतकऱ्यांनी किमान हमीभाव दरापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री करता हमीभाव दराप्रमाणे शासकीय खरेदी केंद्रावर आपला शेतमाल विक्रीस आणावा. ज्या शेतकऱ्यांना सध्या शेतमाल विक्री करावयाचा नसून वाढीव बाजारभावाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. तसेच शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेण्यास विसरु नये, असे आवाहन प्रवीण फडणीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात नाफेड विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत मूग, उडीद सोयाबीन शेतमाल किमान हमीभाव दराप्रमाणे खरेदी करणेसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरु झालआहेत. यात अर्धापूर (नांदेड), मुखेड, हदगाव किनवट येथे नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरु असून नायगाव, भोकर धर्माबाद येथे विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांचे शासकीय खरेदी केंद्र सुरु आहेत. या शासकीय खरेदी केंद्रावर मूग उडीद यांची ऑनलाईन नोंदणी 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत होणार आहे. तर सोयाबीन पिकांची नोंदणी 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस आणताना शेतमाल वाळवून, काडीकचरा विरहीत चाळणी करुन आर्द्रता 12 टक्के पेक्षाकमी असलेला स्वच्छ शेतमाल आणावा.
 शेतमालाचा काढणी हंगाम सुरु झाल्याबरोबर शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत असतो. परिणामी जास्त आवकमुळे बाजारभाव खाली येतात. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक निकडीमुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतू शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर विक्री केल्यास वाढीव बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांस निश्चित होऊन शेतमालास योग्य भाव मिळू मिळतो. यादृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे, असेही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...