अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव
समिती कार्यालयात सादर करण्याचे
आवाहन
नांदेड, दि. 30
:- सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती
औरंगाबाद कार्यालयामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत औरंगाबाद,
जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील सन
2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावसायिक
अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राखीव जागेवर प्रवेश घेणाऱ्या किंवा
प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना त्यांचे अनुसूचित जमातीचे जमात
प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी प्रस्ताव 7 ऑक्टोंबर 2019 ते 31 एप्रिल 2020 पर्यंत या
समिती कार्यालयात सादर करण्याकरिता जाहिर आवाहन करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांचे
प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये
यासाठी या समिती कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले जमात
प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयाशी संपर्क साधून सदर
प्रकरणाचा पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात
प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी, चुक किंवा अपुर्णता राहू नये याची दक्षता घेण्यात
यावी, असे आवाहन सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी
समिती औरंगाबाद यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment