Saturday, October 26, 2019


प्रेस नोट
माहे जुलै ते ऑक्‍टोबर, 2019 मधील अतिवृष्‍टी व पुरबाधित व्‍यक्‍तींना मदतीबाबत 
           महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय दि.11 सप्‍टेंबर,  2019 अन्‍वये माहे जुलै व ऑगस्‍ट 2019 तसेच सप्‍टेंबर ते  ऑक्‍टोबर, 2019 मधील अतिवृष्‍टी व पुरामुळे शेतीपिकांचे 33 % किंवा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांना सदर पिकासाठी घेतलेल्‍या पिककर्जाची माफी व पिक कर्ज न घेतलेल्‍या शेतक-यांना 1 हेक्‍टरच्‍या मर्यादेत NDRF/SDRF च्‍या दराच्‍या तिप्‍पट दराने मदत देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
   त्‍यानुषंगाने जिल्‍हाधिकारी श्री. अरूण डोंगरे यांचे निर्देशानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून दि.27.09.2019रोजीच्‍या पत्रान्‍वये सर्व संबंधित यंत्रणांना जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड, सर्व उपविभागीय अधिकारी, जि. नांदेड व सर्व तहसिलदार जि. नांदेड यांना झालेल्‍या नुकसानीबाबत पंचनामे करून अहवाल सादर करणेस्‍तव कळविण्‍यात आलेले आहे. तसेच पुनश्‍च जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून दि.10.10.2019 व दि.26.10.2019 रोजीच्‍या पत्रान्‍वये नुकसानीबाबत अहवाल सादर करणेस्‍तव यंत्रणांना कळविण्‍यात आलेले आहे.
            तसेच जिल्‍हाधिकारी श्री. अरूण  डोंगरे यांचे निर्देशानुसार अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसानीबाबत ज्‍या      शेतक-यांनी पीक विमा भरलेला आहे. अशा बाधित शेतक-यांच्‍या नुकसानीबाबत महसूल व कृषी विभागाशी संपर्क साधून नुकसानग्रस्‍त शेतक-यांचे (क्‍लेम) दावे भरून मंजुरीसाठी विमा कंपनीकडे त्‍वरीत पाठविण्‍याबाबत व बाधित शेतकरी वंचीत राहणार नाही याबाबत खबरदारी घेण्‍याबाबत 1) जिल्‍हा प्रतिनिधी, भारतीय कृषी विमा कंपनी मर्या., नवीन स्‍टॉक एक्‍स्‍चेंज बिल्‍डींग, 20 मजला, दलाल स्‍ट्रीट मुंबई,  2) जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड, 3) क्षेत्रिय व्‍यवस्‍थापक अॅग्रीकल्‍चरल इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडियालि. क्षेत्रिय कार्यालय, दलाल स्‍ट्रीट, मुंबई 4) सर्व उपविभागीय अधिकारी, जि.नांदेड व 5) सर्व तहसिलदार जि. नांदेड यांना जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्‍यात आलेले आहे.
            खरीप 2019 हंगामात अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसानीबाबत सर्व क्षेत्रीय स्‍तरावरील कार्यालयाना सूचना देण्‍यात आल्‍या असून, बाधित शेतकरी अर्थसहायपासून वंचीत राहणार नाही, याबाबत सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...