86-नांदेड
उत्तर विधानसभा मतदारसंघात
मतदार जनजागृतीसाठी रथ मार्गस्थ
नांदेड, दि. 30 :- उत्तर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने स्वीप कक्षाची स्थापना केली आहे. दिनांक 29 सप्टेंबर 2019 रोजी मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन व स्वाक्षरी मोहिम फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदूणे यांचे हस्ते करण्यात आले.
मतदारसंघात रथफेरीद्वारा मतदार
जनजागृती केली जाणार आहे. तसेच मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार
आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात, ग्रामीण भागात व मोक्याच्या ठिकाणी
रथफेरीद्वारे मतदान करण्यासाठी संदेश प्रसारित करण्यात येत आहे, अशी माहिती नांदेड
उत्तर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी दिली.
या कार्यक्रमास स्वीप कक्ष प्रमुख तथा
गटशिक्षणाधिकारी आर. एल. आडे, तहसिलदार श्रीमती वैशाली पाटील, आर. डब्लू. मिटकरी,
नायब तहसिलदार सुनिल माचेवाड तसेच कर्मचारी गणेश नरहिरे, माधव पवार, गणेश रायेवार,
श्रीमती कविता जोशी, संजय वाकोटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment