Wednesday, August 21, 2019


पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ
खरेदी, सेवन करण्याचे टाळावे   
नांदेड, दि. 21 :- पावसाळी मोसमात वातावरणातील जीवजंतूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांच्या संसर्गामुळे अन्नपदार्थ दुषित होण्याचा दाट संभव असतो. नागरिकांना बाजार पेठेतील उघड्यावरील तयार अन्नपदार्थाची खरेदी व सेवन कटाक्षाने टाळावे, शिळे अन्नपदार्थ आवर्जुन टाळावेत. शिळ्या भाज्या, फळे यांची खरेदी व सेवन टाळावे. बाजार पेठेतील मिठाई खरेदी करताना किंवा हॉटेल मधील पदार्थ सेवन करताना ते स्वच्छ झाकून ठेवल्याची खात्री करूनच खरेदी किंवा सेवन करावे.
            हातगाड्यावरील अथवा हमरस्त्यावर विक्रिस असणारे अन्नपदार्थ, पुरेशी स्वच्छतेची दक्षता न घेतल्याने, शरीरास हानिकारक ठरू शकतात त्यांचे सेवन करण्यापूर्वी स्वच्छता व सुरक्षितता तपासून खरेदी व सेवन करावी. खानावळ, भोजनालय, मेस, रेस्टॉरन्ट, हॉटेल मधील खाद्यपदार्थ व पाणी स्वच्छ व सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावे. किराणा माल खरेदी करताना तो कोरडा, बुरशीमुक्त नसल्याची खातरजमा करावी. सर्व अन्नपदार्थाची खरेदी बिले आवर्जुन घ्यावीत, मालाची खरेदी करताना परवानाधारक पेढीधारकाकडूनच खरेदी करावी.
            ही दक्षता घेतल्यास अन्नविषबाधा सहज टाळता येऊ शकते. तसेच अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम व नियमन अंतर्गत परवाना, नोंदणी घेवूनच व्यवसाय करावा. घेतलेला परवाना, नोंदणी व्यवसायाच्या दर्शनी भागावर सर्वसामान्यपणे ग्राहकांना दिसेल अशा प्रकारे लावावा. विना परवाना / नोंदणी व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. हा परवाना/ नोंदणी fssai च्या च्या वेबसाइटवरुन ऑनलाईन पद्धतीने आवश्यक ते कागदपत्र अपलोड करू शकता, असे आवाहन  अन्न व औषध प्रशासनाचे पदावधित अधिकारी व सहायक आयुक्त (अन्न)  तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.  
00000
वृत्त क्र. 574
शेतकऱ्यांनी कपाशीवरील
गुलाबी बोंड अळीची काळजी घ्यावी
नांदेड, दि. 21 :- जिल्हयात जुन महिन्यात लागवड केलेल्या बी.टी. कपाशी पीक हे पानेफुले लागण्याच्या अवस्थेत आहे. या कापसावर अल्पप्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळुन आला होता.
शेतकऱ्यांना गुलाबी अळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शनास्तव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे , कापुस संशोधन केंद्र नांदेडचे शास्त्रज्ञ के. एम. बेग,  डॉ. शिवाजी तेलंग   तालुका कृषि अधिकारी बी. एस. शिंगाडे यांनी नुकतेच मौजे. दाभड येथील मारोती चंद्रकांत टेकाळे, कलदगाव येथील गोविंद तुकाराम कोकाटे, बापुराव किशनराव गव्हाणे, चंद्रकांत किशनराव गव्हाणे यांच्यकापुस पिकाची पहाणी केली असता सध्या शेतकऱ्यांनी कपाशीवर किटकनाशकाची फवारणी केल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसुन आला नाही.
नांदेड कापुस संशोधन केंद्र कृषि विभाग नांदेड यांनी पुढीलप्रमाणे गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे निरिक्षण करण्यासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे, शेतामध्ये लावावीत तर गुलाबी बोंडअळीचे पतंग नष्ट करण्यासाठी हेक्टरी 40 कामगंध सापाळयाचा वापर करावा. पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी किंवा झाडिरॅक्टीन 1500 पीपीएम 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास क्विनॉलफॅास 25 EC 20ml किंवा थायोडिकार्ब 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.सोयाबीन पिकावरील अळीचे नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 25 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
या क्षेत्रिय भेटीदरम्यान मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी मंडळ कृषि अधिकारी श्री नेमाणीवार, कृषि पर्यवेक्षक के. एस. पाटील, कृषि सहाय्यक श्रीमती. एस. पी. काटकर, शंकर टेकाळे, दर्शन टेकाळे,  गोविंद कोकाटे,  चंद्रकांत गव्हाणे आदी उपस्थित होते.
00000
वृत्त क्र. 575
महाआरोग्य शिबीराचे आयोजन
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यातील किनवट व  गोकुंदा  या आदिवासी भागातील रुग्णांसाठी 24 ते 27 ऑगस्ट 2019 या कालावधीत उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे वैद्यकीय व दंतरोग महाआरोग्य  शिबिराचे आयोजन उपसंचालक डॉ. एकनाथ  माले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या कालावधीत रुग्णांचे (नेत्ररोग तपासणी, सर्व प्रकारचे कर्करोग, मौखिक आरोग्य, उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थिरोग, पोटांचे आजार, मानसिक आजार व महिलांसंबंधी आजार इ.) आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीअंती आढळलेल्या संशयित रुग्णांचे  सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांमार्फत योग्य ते उपचार व आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. किनवट गोकुंदा परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 576
ऑटोरिक्षा परवाना नोंदणीला
31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 21 :-  खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणी करण्यास 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शासन निर्णय दि.18 जुलै 2019 मधील अटी शर्तीनुसार खाजगी संवर्गातील नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा या फक्त महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात परवान्यावर नोंदणी करता येतील.
याबाबत आवश्यक सूचना अटी शर्ती संदर्भात माहिती करावयाची असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे कक्ष क्र.22 (परवाना विभाग) या ठिकाणी सर्व तपशीलवर माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. नांदेड जिल्हयातील ऑटोरिक्षा चालकांनी याची नोंद घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अर्ज करुन परवाने घेण्यात यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

           
वृत्त क्र. 577
शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 21 :- जिल्हयात  कापुस, सोयाबीन, तुर पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतक-यांनी खालीलप्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी संदेश देण्यात येत आहे.
कापुस :- गुलाबी बोंडअळीसाठी 5 टक्के निंबोळी अर्क किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी. 20 ग्रॅम माव्यासाठी फलोनीकेंमीड 50 डब्ल्यु जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी .
 सोयाबीन :- उंटअळया , तंबाखुवरील पाने खाणा-या अळी चक्रीभुंग्यासाठी स्पायनोटोरम 11.7 एस सी 9 मिली किंवा क्लोरेंनट्रानिलीप्रील 18.5 एससी 4 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 578
"युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही " 
जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन  
नांदेड, दि. 21 :- "युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही " राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रम अंतर्गत सन 2019-20 साठी  नांदेड जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन शनिवार 24 ऑगष्ट 2019 रोजी सकाळी 10 वा. नेताजी सुभाशचंद्र बोस महाविद्यालय बंदाघाट, नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्र उभारणीकरीता युवा शक्तीचा विधायक हिस्सा वाढविण्यासाठी तसेच युवांचे विचार अपेक्षा जाणून घेऊन राष्ट्रीय राज्य निर्माणामध्ये सामाजिक कार्यासाठी युवांना प्रोत्साहीत करुन त्यांच्यामधील नेतृत्व गुणांचा विकास, प्रगल्भपणे विचार करण्याची दृष्टी नवसंकल्पना मांडण्याची संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. याहेतूने "युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही " या कार्यक्रमाचे आयोजन शासनामार्फत राज्यस्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.
नांदेड जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रमाचे अंतर्गत विषय पुढील प्रमाणे राहतील. प्रधानमंत्री जन-धन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम अभियान, श्रमदान, प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्यमान भारत, सर्वांसाठी घरे, सेवा हमी कायदा, मुद्रा योजना,  पिक विमा योजना, मुख्यमंत्री/ प्रधानमंत्री सडक योजना, जलयुक्त शिवार अभियान, कौशल्य विकास कार्यक्रम, सुप्रशासन, भारताची चंद्रयान मोहीम.
शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्यावतीने  शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका/ गटस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक प्राविण्य प्राप्त इयत्ता 11 वी 12 मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रथम, द्वितीय तृतिय येणा-या स्पर्धकांना अनुक्रमे 10 हजार रुपये, 7 हजार रुपये 5 हजार रुपये रोख पारितोषीक, स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.  तसेच जिल्हास्तरावरील प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना राज्यस्तरावर आयोजीत होणा-या युवा संसद कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधु, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण, माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य प्राध्यापक आदी परिश्रम घेत आहेत.
जिल्हयातील तालुकास्तरावर प्राविण्य प्राप्त स्पर्धकांनी 24 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रमसाठी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 579
दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे
नांदेड येथे 23 ऑगस्ट रोजी आयोजन   
            नांदेड, दि. 21 :- जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 रोजी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.  
            या मेळाव्यात धुत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद, नवभारत फर्टीलायझर प्रा. लि. औरंगाबाद, फ्लेमिंगो फार्यासुटीकल्स लि. कृष्णूर, समता मायक्रो फायनंस लि. या कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे.  ट्रेनी ऑप्रेटर, फिल्ड ऑफिसर, प्रशिक्षणार्थी, कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर या पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यावेळी उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी कार्ड असल्यास व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत घेऊन यावे, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य, विकास, राजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.  
000000
वृत्त क्र. 580
गटई कामागरांना लोंखडी पत्र्याचे स्टॉल ;
अर्जदारांना त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन
            नांदेड, दि. 21 :- गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविण्यासाठी अनुसूचित जातीतील (चांभार व ढोर) या जातीतील लाभार्थ्यांसाठी गटई स्टॉल (लोखंडी पत्र्याचे) शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज  मागविण्यात आले होती. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र, अपात्र व त्रुटीतील लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. त्रुटीची पुर्तता करुन शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 रोजी कार्यालयीन वेळेत सामाजिक न्याय भवन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय ग्यानमाता हायस्कूल समोर अर्धापूर रोड नांदेड येथे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. याची संबंधितांनी नोंद असे आवाहन तेजस माळवदकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000



वृत्त क्र. 581
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना
            नांदेड, दि. 21 :-  केंद्र शासनामार्फत जिल्ह्यातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पी.एम.के.एम.वाय.) ही शुक्रवार 9 ऑगस्ट 2019 पासून सुरु केली आहे.
            या योजनेसाठी भु-अभिलेखांनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावे दोन हेक्टर पर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे असे शेतकरी पात्र आहेत. ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना असून मार्गदर्शक सुचनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी (अपात्रतेचे निकष लागू असलेले शेतकरी वगळून) त्यांच्या 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांनी वयाच्या 60 वर्षापर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतकऱ्यांचा मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन पेन्शन फंडामध्ये भरणार आहे. या शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर मासिक रक्कम 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
0000
वृत्त क्र. 582
क्रीडांगण, व्यायामशाळा विकास अनुदान
योजनेंतर्गत प्रस्ताव करण्याचे आवाहन  
            नांदेड, दि. 21 :- जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्रीडांगण विकास योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडागुण विकसित करण्यासाठी सुयोग्य क्रीडांगण व क्रीडांगणावर मुलभूत सुविधा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टिने क्रीडांगण विकास व व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यात येते. ही योजना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे.
            त्यानुसार सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी (सर्वसाधारण, विशेष घटक व आदिवासी भागातील) अनुदान मागणीसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत पात्र संस्थांनी अर्ज विक्री व आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव स्वीकृती सेतू सुविधा केंद्र (एनआयसी) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शुक्रवार 23 ऑगस्ट ते शनिवार 7 सप्टेंबर 2019 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 583
vUu lqj{kk ekuns dk;nk 2006 fu;e o fu;eu 2011
xqV[kk] ikuelkyk o rRle inkFkkZph fodzh dj.kk`;k dkjokbZ
fn-01-07-2019 jksth V!d dzekad MH-14 AS-7755 ;k okgukrqu izfrcaf/kr vUuinkFkkZph fodzhlkBh okgrqd djhr vlrkauk iksyhl LVs'ku ekGkdksGh rk-yksgk ;sFks tIr vlysYkk izfrcaf/kr vUuinkFkkZpk fdaer jQ- 10]50]000$& pk lkBk ek- U;k;ky;kP;k vkns'kkUo;s fn-16-08-2019 jksth vUu o vkS"k/k iz'kklu e-jkT;] uaknsM ;sFkhy vUu lqj{kk vf/kdkjh Jh larks"k fo-dudkokM ;kauh da/kkj rs ckHkqGxko f'kokjkr eksdG;k o futZu LFkGh tkGwu u"V dj.;kr vkyk vkgs- izfrcaf/kr vUuinkFkZ okgrqd dj.kkjk V!d tIr vlqu R;kph uksan.kh (vkj Vh vks ijokuk) jnn ckcr lacaf/kr izkf/kdkjh ;kauk dGfo.;kr vkys vkgs-
mijksDr dkjokbZ Jh larks"k fo-dudkokM vUu lqj{kk vf/kdkjh ;kauh
Jh rq-pa-cksjkGdj] lgk;d vk;qDr (vUu)] vUu o vkS"k/k iz'kklu e-jkT;] ukansM ;kaP;k ekxZn'kZuk[kkyh dsysyh vkgs- 
izfrcaf/kr vUuinkFkkZph lkBo.kwd] okgrwd] fodzh o mRiknu dj.kk`;k vUu O;kolk;hdkfojQ/n ;kiq<s fu;fer dk;Zokgh ?ks.;kr ;s.kkj vlwu lnj vUuinkFkZ dks.khgh NqI;k] pksjV;k i/nrhus fodzh] mRiknu] lkBk] okgrqd djQ u;s vls vkokgu vUu o vkS"k/k iz'kklu ukansM ;akP;kdMwu dj.;kr ;sr vkgs- izfrca/khr vUuinkFkkZps lanHkkZr lnj izdj.kkr vUulqj{kk ekuns dk;|kvarxZr dehrdeh lgko"kkZph dkjkokl o jQ- 5 yk[k nzO;naMkP;k f'k{ksph rjrqn vkgs-
vkiyk
(rq-pa-cksjkGdj)
lgk;d vk;qDr
vUu o vkS"k/k iz'kklu e-jkT;] ukansM
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...