Thursday, August 29, 2019


अन्न व नागरी पुरवठा मंत्री
संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा
नांदेड दि. 29 :- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 6.30 वा. महाजनादेश यात्रानिमित्त नवा मोंढा नांदेड येथील जाहिर सभेस उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.
शनिवार 31 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 12 वा. महाजनादेश यात्रानिमित्त लोहा येथील जाहिर सभेस उपस्थिती. त्यानंतर महाजनादेश यात्रानिमित्त अहमदपूर येथील जाहिर सभेसाठी प्रयाण करतील.  
00000
वृत्त क्र. 614
उद्योग आणि खनिकर्म
राज्यमंत्री अतुल सावे यांचा दौरा
नांदेड दि. 29 :- राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 ऑगस्ट 2019 रोजी कळमनूरी आखाडा बाळापूर येथून सायं. 4.45 वा. महाजनादेश यात्रा स्वागत सभा अर्धापूर येथे उपस्थिती. सायं. 6.30 वा. महाजनादेश यात्रेचे नांदेड येथे आगमन व                     मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सभेस उपस्थिती. स्थळ - नवा मोंढा नांदेड. सायं 7.30 वा. नांदेड येथून जिंतूरमार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
00000
वृत्त क्र. 615

कृषि समिती बैठक संपन्न
 नांदेड दि. 29 :- कृषि समितीची मासिक आढावा बैठक जिल्हा परिषदेचे कृषि पशुसंवर्धन सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेस सचिव म्हणून कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी काम पाहीले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार बास्टेवाड, मारोती लोखंडे, पंचायत समिती मुखेडचे सभापती अशोकराव राविकर तसेच जिल्हा कृषि अधिकारी अनिल शिरफुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी श्री सिरस, सर्व तालुक्याचे कृषि अधिकारी उपस्थित होते.
या सभेसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी पंचायत समिती स्तरावर ऑनलाईन प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा तसेच जिल्हा परिषद उपकर योजने अंतर्गत लाभ दयावयाच्या विविध कृषि साहित्यांची मागणी प्राप्त प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव परिपुर्ण आहेत अशा शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या अधिन राहून खुल्याबाजारातून डीबीटी पध्दतीने औजारे खरेदी करणेसाठी पुर्वसंमती देण्यात यावी असे ठरले.
जिल्हयातून प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे 16 कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचे तसेच राज्यस्तरीय कृषि पुरस्कारासाठी तालुकास्तरावरुन पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव 5 सप्टेंबर 2019 पर्यंत सादर करणेसाठी सर्व कृषि अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. सन 2018-19 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) अंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यापैकी ज्या शेतकऱ्यांच्या नविन विहीरींचे काम पुर्ण झाले आहे. अशा शेतकऱ्यांना ठिबक/तुषार सिंचनसंच मिळणेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तसेच विज जोडणी मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशनची रक्कम भरणा करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना कळविण्यासाठी कृषि अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
ऑगस्ट 2019 अखेर सेवानिवृत्त होणारे पंचायत समिती कंधारचे कृषि अधिकारी विजय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी उपस्थितीतांचे आभार जिल्हा कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...