पाणी टंचाईवर मात करण्यासाठी
पावसाच्या पाण्याचे
योग्य नियोजन करा
-
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
नांदेड दि. 1 :- पावसाचे छतावर
पडणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जास्तीतजास्त
प्रमाणात पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी
कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे पुढाकारातून पावसाच्या पाण्याची
साठवण (रेन वॉटर हार्वेस्टींग) करण्याच्या कामाची सुरवात आज करण्यात आली. त्यावेळी
ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री.
डोंगरे म्हणाले, पावसाची अनियमितता आणि पडणारे पर्जन्यमान, वाढती लोकसंख्या,
वृक्षतोड आदि विविध कारणांमुळे सतत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे.
जमिनीतील पाणी अतिउपश्यामुळे भूजलाचे योग्य प्रमाणात पुनर्भरण न झाल्याने स्त्रोत
कोरडे पडत आहेत.
श्री पौळ म्हणाले, पाणी
पातळी खाली गेली असून हे पाहता पावसाचे पाणी जमिनीत पुर्नभरणाशिवाय पर्याय
नाही.
यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त लहूराज माळी, निवासी उपजिल्हाधिकारी
श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, धर्माबाद उपविभागीय अधिकारी
सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार किरण अंबेकर आदि. विविध
विभागाच्या विभाग प्रमखांची यावेळी उपस्थिती होती.
0000
No comments:
Post a Comment