Wednesday, July 31, 2019


भारतीय डाक विभागाकडून

 राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा

नांदेड, दि. 31 :- भारतीय डाक विभागाकडून राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा  ढाई आखर या शीर्षकाखाली आयोजित केली आहे. पत्राचा विषय Dear Bapu ,You are Immortal/ प्रिय बापू आप अमर है या विषयावर लिहावयाचे असून पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येते.

ही पत्र लेखन स्पर्धा वय वर्षे 18 पर्यंत एक गट व वय वर्षें 18 च्या वर दुसरा गट अशा दोन गटात विभागलेली आहे. स्पर्धकानी स्वत:चे वय दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी 18 पेक्षा कमी किंवा जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख करुन स्वत:चे नाव पत्ता व वयाचा उल्लेख असावा.

हे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल मुंबई यांच्या नावाने लिहून डाकघरामार्फत लावलेल्या विशेष टपाल पेटीत टाकावयाचे आहे. पाकिटातून पत्र पाठवण्याची शब्द मर्यादा 1 हजार व अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दाची आहे. पत्र पाठविण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2019 ही आहे. मुदती नंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेत समावेश करण्यात येणार नाही.

राज्य स्तरावर  उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे रुपये 25 हजार, 10 हजार व 5 हजार रुपये पारितोषक दिले जाईल. राज्य स्तरावर  निवडलेल्या प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राला राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 50 हजार, 25 हजार व 10 हजार रुपये पारितोषक देण्यात येईल. जास्तीतजास्त संख्येने नागरिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड डाक अधिक्षक एस बी लिंगायत यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...