Wednesday, June 19, 2019

योग साधनेची रंगीत तालीम संपन्न



नांदेड, 19 :- योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 21 जून 2019 रोजी नांदेडमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय योग शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. यानिमित्‍त शिवरत्‍न जिवाजी महाले चौक (मामा चौक), असर्जन येथील मैदानावर आज बुधवार दिनांक 19 जून 2019 रोजी पहाटे 5 वाजता योग साधनेची रंगीत तालीम घेण्‍यात आली. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांनी प्राणायाम व योगसाधनेचा सराव केला.
     याप्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पतंजली योगपीठाचे मुख्‍य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, लेखाधिकारी निलकंठ पाचंगे, राजेश पवार, जि.प. सदस्‍या पुनम पवार, मिलिंद देशमुख, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी सामान्‍य योग, शिथिलीकरण आसन, उभे राहून करण्‍यात येणारे ताडासन, पादहस्‍तानसन, अर्ध्‍दचक्रासन, त्रिकोणासन तर बसून करण्‍यात येणा-या आसनामध्‍ये दण्‍डासन, भद्रासन, वीरासन, उर्ध्‍द अष्‍ट्रासन, शशकासन, उत्‍तानमंडूकासन, वक्रासन, उत्‍तनमंडूकासन, पोटावर झोपून करावयाचे आसनामध्‍ये मकरासन, भुजंगासन, शलभासन तसेच पाठीवर झोपून करण्‍यात येणा-या आसनामध्‍ये सेतूबंध आसन, अत्‍तानपाद आसन, अर्ध हलासन, पवन मुक्‍तासन, श्‍वासन, योग निद्रा त्‍याचप्रमाणे प्राणायामामध्‍ये कपालभारती, अनुलोमविलोम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व ध्‍यान अशा सात प्रकारातील विविध आसने व प्राणायामाचे प्रशिक्षण देण्‍यात आले. यावेळी विविध कार्यालयाचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पतंजली योग समितीचे सदस्य, पत्रकार, महिला व पुरुष यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. उद्या गुरुवार 20 जून रोजी पहाटे साडेचार वाजता पुन्‍हा एकदा रंगीत तालीम याच मैदानावर घेण्‍यात येणार आहे.
सुस्थितीत कार्यक्रम पार पाडावा - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 21 जून 2019 रोजी नांदेडमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय योग शिबीर घेण्‍यात येत आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्‍यासाठी सर्वांनी सहाकार्य करावे असे आवाहन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
आज शिवरत्‍न जिवाजी महाले मैदान असर्जन येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत योग दिनानिमित्‍त घेण्‍यात येणा-या शिबिर पूर्व तयारीचा आढावा त्‍यांनी घेतला. यावेळी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्‍हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्‍त लहुराज माळी, जिल्‍हा पोलिस अधिक्षक संजय जाधव, अप्‍पर जिल्‍हाधिकारी कुशालसिंह परदेशी, जि.प. सदस्‍य तथा माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, चैतन्‍यबापू देशमुख, मिलिंद देशमुख, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर. कोंडेकर, यू.डी. इंगोले, एस.व्‍ही. शिंगणे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कुंडगीर, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. बी.पी. कदम यांच्‍यासह विविध विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
21 जून रोजी अधिकारी, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, गावकरी, महिला बचतगटातील सदस्‍य, आरोग्‍य कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक तसेच महिला व पुरुषांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...