गुटखा,
पानमसाला कार्यवाहीत
51 हजार रुपयाचा साठा जप्त
अन्न व औषध
प्रशासनचे सुरक्षा अधिकारी यांनी 20 मे रोजी माहूर शहरातील नगीना मसिद जवळ शेख
युसुफ शेख रशिद (वय 40 वर्षे) व किनवट नालागड्डा येथील असिफखान मसिदखान (वय 32
वर्षे) या व्यक्तीच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, सुगंधित तंबाखू
आदींचा एकुण 51 हजार 074 रुपयाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध
पोलीस स्टेशन माहूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. मा.
न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास आजीवन तुरुगंवास आणि 10 लाख
रुपयापर्यंत शिक्षेची तरतुद आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड
यांनी सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment