Wednesday, April 10, 2019


दारु दुकाने शनिवारी बंद
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात श्री रामनवमी उत्सव शनिवार 13 एप्रिल 2019 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहे.
या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी शनिवार 13 एप्रिल 2019 रोजी श्री रामनवमी उत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बिआर-2, ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 230 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत अवसायकांची नामतालिका (पॅनल) साठी मागविण्यात आले अर्ज   नांदेड दि. 25 फेब्रुवारी ...