Sunday, March 31, 2019


प्रचार व प्रसार माध्‍यमांचा प्रचारासाठी
गैरवापर करणाऱ्यांवर जिल्‍हा प्रशासनाची करडी नजर

नांदेड,दि. 31 :- जिल्‍हा माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षात जिल्‍हा प्रशासनाने प्रसार माध्‍यमांद्वारे प्रचारासाठी गैरवापर होवू नये. यासाठी जिल्‍हा माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत करडी नजर ठेवण्‍यात येत आहे. आदर्श आचार सहिंतेचा भंग होवू नये यासाठी प्रचार व प्रसार माध्‍यमांचा प्रसारासाठी गैरवापर करणा-यावर तसेच विनापरवानगी प्रचार करणा-यावर कार्यवाही करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी भेटी दरम्‍यान दिले.
या दरम्‍यान जिल्‍ह्यात वर्तमानपत्रामध्‍ये येणा-या बातम्‍या, वृत्‍त, लेख तसेच समाजमाध्‍यमांतील व्‍हॉट्स अप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्‍ट, मोबाईलद्वारे एसएमएस, बल्‍क एसएमएस अथवा प्रचार करणा-या तसेच सेवा पुरवविणा-या एजन्‍सीना यावेळी नोटीसा बजावल्‍या आल्‍या असून यासंदर्भात कारवाईचे निर्देशही त्‍यांनी समिती सदस्‍यांना यावेळी दिले.
तसेच विविध भाषेतील ऊर्दू, हिंदी, इंग्रजी या माध्‍यमातील दैनंदिन वृत्‍त अहवालाची तपासणी केली. मिडिया कक्ष स्थित स्‍थानिक वृत्‍त वाहिन्‍यांसह विविध वृत्‍त वाहिन्‍यांवरुन प्रसारित झालेल्‍या बातम्‍यांचाही यावेळी आढावा घेण्‍यात आला.  
उमेवारांचे फेसबुक, व्टिटर, इन्‍स्‍टाग्राम, युट्युब, व्‍हॉट्स अप या समाज माध्‍यमातून आक्षेपार्ह मजकूर अथवा ऑडिओ, व्हिडीओ क्लिप, संदेशातील मजकूर यासंदर्भात समितीने दैनंदिन अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचनाही जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी सुचना केल्‍या.
यावेळी उपजिल्‍हाधिकारी निवडणूक प्रशांत शेळके, जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्‍हाण, माहिती अधिकारी तथा सदस्‍य सचिव श्रीमती मीरा ढास, प्रा. डॉ दीपक शिंदे समिती सदस्‍यांची उपस्थिती होती. मिलिंद व्‍यवहारे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...