इतर मागासवर्ग
प्रवर्गातील गरजूंना स्वंयरोजगारांसाठी थेट कर्ज योजना अर्ज
करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 05 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये 25 हजारावरुन एक लाख वाढविण्यात आलेली आहे .
ही योजना इतर
मागासवर्गीय घटकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना स्वंयरोजगारास प्रोत्साहित
करण्याकरिता व इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना या महामंडळाच्या कर्ज योजनेची
माहिती व्हावी व त्यांनी या कर्ज योजनेचा जास्तीत-जास्त लाभधारकांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त
आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, ग्यान माता शाळेच्या समोर , नांदेड यांनी केले आहे.
लाभार्थ्याची
पात्रता अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी
असावा. अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर किमान
500 इतका असावा. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा
जास्त नसावे (सक्षम प्रधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार),
कुटूंबांतील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शासनाच्या कौशल्य विकास
विभागामार्फत तसेच शासकीय / निमशासकीय संस्थामधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले तरुण
युवक, युवतींना तसेच निराधार व विधवा महिलांना कर्जासाठी प्राधान्य राहणार आहे.
अर्जदाराने आधार कार्ड सलग्न बँक खात्याचा तपशिल सोबत सादर करावा. अर्जदार
महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.
000000
No comments:
Post a Comment