Friday, March 22, 2019


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
सोमवारी स्थानिक सुट्टीच्या दिवशी
 नामनिर्देशन पत्र स्विकारली जाणार  
नांदेड, दि. 22 :-  कंधार ऊर्स निमित्त सोमवार 25 मार्च 2019 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली असली तरी यादिवशी सार्वत्रिक निवडणूक लोकसभा-2019 चे नामनिर्देशन पत्र विहित वेळेत स्विकारली जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.  
सोमवार 25 मार्च 2019 रोजी कंधार ऊर्स निमित्त नांदेड जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतू भारत निवडणूक आयोगाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांचे निजी कक्षात सोमवार 25 मार्च 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...