प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत
2 लाख 79 हजार पात्र शेतकरी कुटूंबाची नोंदणी
नांदेड, दि. 28 :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत नांदेड जिल्ह्यात 2 लाख 79 हजार 391
पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या शेतकरी
कुटूंबांना 2 हजार रुपयाचा पहिल्या हप्त्याचा लाभ मिळत असून नांदेड जिल्ह्यात पात्र
कुटुंबाची नोंदणी टक्केवारी 95.73 एवढी आहे.
जिल्ह्यात नमुना आठ अ प्रमाणे 7 लाख 95 हजार 800 खातेदार शेतकरी
आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत
परिशिष्ट-अ नुसार अनिवार्य माहिती संकलीत झालेली 1 हजार 568 गावातील परिपूर्ण
असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या 2 लाख 91 हजार 866 आहे. पोर्टलवर नोंदणी
केलेली गावे 1 हजार 562 एवढी आहेत. या योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक पात्र शेतकरी कुटुंबांना 3 हप्त्यात 6 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. शेतकरी कुटुंबाची सर्व ठिकाणचे 2 हेक्टर
किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी करण्यात आली आहे.
पात्र खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक
खाते क्रमांक व आयएफएससी कोड,
आधार क्रमांक ओळखपत्र, जन्म
दिनांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक आदिची माहिती संकलीत करुन ती संबंधित तहसील
कार्यालयातून पोर्टलवर अपलोड केली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाकडून
देण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment