राष्ट्रीय
बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
12 बालके हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना
नांदेड दि. 27 :- हृदयरोग आढळून आलेल्या 12 बालकांना हृदय शस्त्रक्रियासाठी घाटकोपर मुंबई येथील हिंदुसभा रुग्णालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवन या एक्सप्रेस रेल्वेने
पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.
पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर.
मेकाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ ए. पी. वाघमारे, जिल्हा समन्वयक अनिल कांबळे,
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि बालकांचे पालक उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात
अंगणवाडी व शाळातील बालकांची 45 आरोग्य पथकांमार्फत दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. यावर्षात शुन्य ते 18 वयोगटातील 7 लाख 68 हजार 746 बालकांपैकी 6 लाख 80 हजार 367 बालकांची जानेवारी 2019 अखेर आरोग्य तपासणी
करण्यात आली आहे. या
तपासणीत 4 हजार 954
बालकांना ग्रामीण,
उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड आदी
ठिकाणी निदान व उपचार करण्यात आले. यात 102 बालके हृदयरोगाची आढळून आली त्यापैकी 48 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर आज
12 बालकांना हृदय
शस्त्रक्रियासाठी घाटकोपर
मुंबई येथील हिंदुसभा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे तर 26 बालकांना औषधोपचार व पाठपुरावा करण्यात आला
आहे. उर्वरित 16 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मार्च 2019
मध्ये करण्याचे
नियोजन करण्यात आहे. इतर शस्त्रक्रियेची 172
बालके आढळून
आली असून त्यापैकी 120
बालकांच्या शस्त्रक्रिया
करण्यात आल्या आहेत. तर 20
बालकांना औषधोपचार व पाठपुरावा केला आहे. उर्वरित 32 बालकांची इतर शस्त्रक्रिया मार्च 2019 मध्ये करण्यात येणार आहे,
अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment