शिक्षकांनी विद्यार्थी व समाज घडविण्याबरोबरच
पर्यावरण संतुलनासाठी कसोशीने प्रयत्न करावेत
-
पालकमंत्री रामदास
कदम
नांदेड, दि. 16:- राष्ट्र निर्मितीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे
असून शिक्षकांनी विद्यार्थी व समाज घडविण्याबरोबरच पर्यावरण संतुलनासाठी कसोशीने
प्रयत्न करावेत .शिक्षणाच्या वारीच्या या कार्यक्रमातून हा संकल्प करावा असे आवाहन
पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज केले.
चांदोजी पावडे
मंगल कार्यालय, डी मार्ट, रोड नांदेड येथे दिनांक 16 ते 18
जानेवारी 2019 या कालावधीसाठी आयोजित केलेल्या'
शिक्षणाची वारी' या कार्यक्रमाचे उद्घाटन
त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व संत
तुकारामांची पर्यावरणाप्रतीची बांधिलकी सांगत पाठ्यपुस्तकांमधून पर्यावरण
संवर्धनासाठी आवश्यक लेखनाचा समावेश करण्यासाठी संबंधितांना बोलणार असल्याचे
त्यांनी म्हटले.पर्यावरणात फटाक्याने वातावरण प्रदूषित होते हे सर्वश्रुत आहे
त्यामुळे सणांच्या वेळी फटाके न फोडता पर्यावरण रक्षण करण्यासाठी
विद्यार्थ्यांकडून शपथ घेतली .त्यामुळे गावागावात एक सकारात्मक वातावरण तयार झाले ,असे सांगून शिक्षकांबद्दल त्यांनी अत्यंत आदर व्यक्त केला मी
शिक्षकांमुळेच घडलो आहे. अशी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी त्यांच्या शिक्षण
काळातील अनेक किस्से सांगितले .
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्काईपद्वारा
उपस्थितांशी मुंबईहून थेट संवाद साधला. प्रश्नांना उत्तरे दिली.
राज्याचे
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी , जिल्हाधिकारी अरुण डोंगरे , मुख्य
कार्यकारी अधिकारी अशोक काकडे ,आमदार सुभाष साबणे , विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, नांदेड
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, कृषी
सभापती दत्तात्रय रेड्डी, उपसंचालक संजय यादगिरे, विद्या प्राधिकरणच्या उपसंचालिका शोभा खंदारे,लातूर बोर्डाचे अध्यक्ष महेश
करजगावकर,यवतमाळचे शिक्षणाधिकारी दीपक चवणे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या
जयश्रीआठवले, शिक्षणाधिकारी प्रशांत
दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बालाजी कुंडगीर, निरंतरचे शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, महानगरपालिकेचे
शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे,बीडचे प्राचार्य जयपाल कांबळे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जयश्री आठवले यांनी
केले .यावेळी डायटचे अधिव्याख्याते, व
विषय सहायक यांनी तयार केलेले इंग्रजी शैक्षणिक अॅप व अध्ययन समृद्धी पुस्तिकेचे विमोचन शिक्षण आयुक्त विशाल
सोळंकी व शिक्षण संचालक सुनील मगर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी व अश्विनी कुलकर्णी यांनी तर आभार
उपसंचालक संजय यादगिरे यांनी मानले.
कार्यक्रमास जालना,परभणी,
बीड,लातूर, नांदेड,
उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडक शिक्षक,पालक,
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षण प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर,बी.आर.कुंडगीर, अशोक देवकरे, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता
श्रीकृष्ण देशमुख, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर,दीपक सिरसाठ,अधीक्षक बळीराम येरपूलवार, प्रवीण पाईकराव, चंद्रकांत धुमाळे, नंदिनी शिंदे , उमेश नरवाडे , डॉ.अतुल
चंद्रमोरे, डॉ.माणिक जाधव, डॉ.विलास
ढवळे, शोभा मोकले विशेष सहाय्यक सुरेश पांचाळ, शिवराज पवार ,अनुप नाईक, संतोष
केंद्रे, डॉ.राजेश पावडे,अतुल कुलकर्णी
, शेख नईम, संजय शेळगे, बालासाहेब कच्छवे, रामदास वाघमारे , प्रकाश गोडणारे आदींनी परिश्रम घेतले.
0000
No comments:
Post a Comment