Friday, December 21, 2018


आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची

माहिती सादर करण्याचे आवाहन

            नांदेड, दि. 21:- माहे  डिसेंबर-2018 या महिन्याचे वेतन देयक दाखल करतांना सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनाना सुचित करण्यांत येते की, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती बाबतचे माहे-डिसेंबर-2018 अखेरचे ई. आर-1 त्रैमासिक विवरणपत्र माहे-31 जानेवारी-2019 पर्यंत भरावयाची मुदत असून या कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in  वरुन ऑनलाईन ई-आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके कोषागारात  स्विकारले जाणार नाहीत, याची संबंधीतानी नोंद घ्यावी.  

सर्व कार्यालयांना या कार्यालया मार्फत युजर आय.डी. व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यांत आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयानी आपले ई-मेल आय.डी. व फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर,पॅन नंबर टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असे आवाहन नांदेड कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...