Monday, December 17, 2018


अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक युवतींसाठी

सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण

 

नांदेड, दि. 17:- सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागा मार्फेत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक युवतींसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजुर करण्यात आला आहे. प्रक्षिणाचा कालावधी-तीन महिन्यांचा असुन सदर प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. प्रशिक्षणाकरिता राहणे, भोजन, गणवेश, मैदानी चाचणीचे प्रशिक्षण लेखी चाचणीचे प्रशिक्षण मोफत देण्यात येते.  

तेव्हा पुढील प्रशिक्षण सत्र 01 जोनवारी, 2019 पासुन सुरू होणार आहे. त्यानुसार प्रशिक्षणासाठी  प्रशिक्षणार्थीची निवड करावयाची आहे. अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक युवतींसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्रतेच्या अटी शर्ती खालील प्रमाणे आहेत.

उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे. उमेदवाराची उंची - पुरुष = (165 सेमी) महिला = (155 सेमी) असावी. छाती फुगवता - पुरुष = (79 सेमी) फुगवुन = (84 सेमी) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. उमेदवार हा शारीरिक मानसिक दृष्टया निरोगी असावा.

जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र , ओळखपत्राची सत्यप्रत देणे कागदपत्रे आवश्यक आहेत.

अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक / युवतींना कळविण्यात येते की, त्यांनी दि.17 डिसेंबर, 2018 रोजी सोमवार, सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अर्धापुर रोड, ग्यानमाता हायस्कुल समोर, नांदेड जि.नांदेड येथे मुळ कागदपत्रासह साक्षांकित प्रतीसह अर्ज सादर करावा स्वत: उपस्थित राहावे. हजर राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या - येण्याचा भत्ता दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. असे आवाहन  नांदेडचे  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तेजस माळवदकर यांनी केले आहे.

****  

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...